बदाम कतली | Badam Katali Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Badam Katali recipe in Marathi,बदाम कतली, Deepa Gad
बदाम कतलीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

6

0

बदाम कतली recipe

बदाम कतली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Badam Katali Recipe in Marathi )

 • बदाम १ वाटी
 • पिठीसाखर सव्वा वाटी
 • तूप २ च
 • केशरमिश्रित दूध अर्धी वाटी
 • वेलचीपूड १ च

बदाम कतली | How to make Badam Katali Recipe in Marathi

 1. बदाम गरम पाण्यात घालून १० मिनिटे झाकून ठेवा
 2. नंतर थंड पाण्यात घालून बदामाची साले काढून घ्यावीत
 3. सोललेले बदाम मिक्सरमध्ये घाला त्यातच केशरमिश्रित दूध घालून बारीक पेस्ट करून घ्या
 4. नॉनस्टिक पॅनवर २ च तुपात बदामाची वाटलेली पेस्ट घाला
 5. त्यातच सव्वा वाटी पिठीसाखर घाला आणि सतत ढवळत रहा
 6. गोळा घट्ट होत आला की वेलचीपूड घाला आणि गॅस बंद करून थंड करण्यासाठी डिशमध्ये काढून ठेवा
 7. प्लास्टिक पेपरवर तो गोळा घ्या आणि गोळ्यावर दुसरा प्लास्टिक पेपर ठेवून पोळीप्रमाणे लाटून घ्या
 8. वड्या पाडा

Reviews for Badam Katali Recipe in Marathi (0)