शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी | Shahi dry fruit momos with kesariya rabdi Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shahi dry fruit momos with kesariya rabdi recipe in Marathi,शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी, Ajinkya Shende
शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडीby Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  35

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी recipe

शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi dry fruit momos with kesariya rabdi Recipe in Marathi )

 • मोमोजसाठी-
 • एक वाटी जाडसर कुटलेला सुका मेवा(अक्रोड,काजू, बदाम,गोडंबी,मनुका)
 • २-३ चमचे गुलकंद
 • ४ खजुराचे बारीक काप
 • पाव चमचा वेलची पावडर
 • दीड वाटी मैदा
 • पाऊण वाटी मिल्क पावडर
 • २ चमचे साजूक तूप
 • गरम दुधात भिजवलेल्या १२-१५ केशराच्या काड्या
 • पाव वाटी कंडेंस्ड मिल्क
 • आवश्यकतेनुसार दूध
 • थोडासा खाण्याचा पिवळा रंग
 • केशर रबडीसाठी-
 • दोन वाटी फुल क्रीम दुध
 • पाऊण वाटी कंडेंस्ड मिल्क
 • गरम दुधात भिजवलेल्या १०-१२ केशराच्या काड्या
 • पाव चमचा वेलची पावडर
 • सजावटीसाठी सुकामेवा

शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी | How to make Shahi dry fruit momos with kesariya rabdi Recipe in Marathi

 1. प्रथम एका बाऊलमध्ये मैदा,मिल्क पावडर,कंडेन्स्ड मिल्क,केशर भिजवलेलं दूध,तूप हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यात आवश्यकतेनुसार दूध व आवश्यकता असल्यास थोडा खाण्याचा पिवळा रंग टाकून मैदा मऊसर भिजवून घेणे साधारण अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवणे.
 2. तोपर्यंत एका बाऊलमध्ये सारणासाठी सुका मेवा,गुलकंद,खजुराचे काप व वेलची पावडर एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
 3. नंतर रबडी बनवण्यासाठी एका पसरट पॅन मध्ये दूध उकळत ठेवणे.
 4. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क,वेलची पावडर,दुधात भिजवलेली केशर टाकून दूध घट्ट होईपर्यंत उकळू द्यावे.(दूध उकळत असताना मध्ये मध्ये चाळवत रहावे)
 5. तयार रबडी रूम टेम्प्रेचर ला आल्यावर थोडा वेळ फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी ठेवावी.
 6. नंतर भिजवलेल्या मैद्याची पुरी लाटून त्यात सारण भरून हव्या त्या आकाराचे मोमोज बनवून घेणे.
 7. नंतर एका पातेलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेऊन पाणी उकळत ठेवावे.
 8. पाणी उकळल्यावर एका चाळणीला तुपाने ग्रीसिंग करून त्यात मोमोज रचून ती चाळणी पातेलीवर ठेवून वरून झाकण ठेवून मोमोज उकडीच्या मोदकाप्रमाणे १०-१२ मिनिट वाफवून घेणे.
 9. तयार मोमोज रूम टेम्प्रेचर ला आल्यावर १०-१५ मिनिट फ्रिज मध्ये ठेवून हलकेसे थंड करून घेणे.
 10. नंतर ते मोमोज सर्विंग प्लेट मध्ये रचून सुक्या मेव्याने गार्निश करून घ्यावे व केशर रबडीसोबत सर्व करावे.

Reviews for Shahi dry fruit momos with kesariya rabdi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo