आंबा सॉस | AAMBA sauce Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  21st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • AAMBA sauce recipe in Marathi,आंबा सॉस, Chayya Bari
आंबा सॉसby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

आंबा सॉस recipe

आंबा सॉस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AAMBA sauce Recipe in Marathi )

 • आमरस १ वाटी
 • साखर पाऊण वाटी
 • मीठ चिमुटभर
 • जिरेपूड 1/२चमचा
 • तिखट १/४चमचा
 • साजूक तूप १चमचा

आंबा सॉस | How to make AAMBA sauce Recipe in Marathi

 1. तयारीत आंब्याचा रस काढून मिक्सरवर फिरवून एकजीव करावा
 2. नॉनस्टिक पण मध्ये 1 चमचा साजूक तूप घालावे व रस घालावा
 3. नंतर तो थोडा आटला कि साखर,मीठ,जिरेपूड घालून आणखी आटवावा सतत हलवावे
 4. ५मिनिटाने त्यात तिखट घालून हलवावे व उतरून ठेवावा फार घट्ट करू नये गार झाला की घट्ट होतो बाटलीत भरून ठेवावा

My Tip:

तिखटा ऐवजी काळी मिरपूड वापरता येते

Reviews for AAMBA sauce Recipe in Marathi (0)