जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल) | Ginger lemon flavoured melon punch(Mocktail) Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  23rd May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ginger lemon flavoured melon punch(Mocktail) recipe in Marathi,जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल), Ajinkya Shende
जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल)by Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल) recipe

जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ginger lemon flavoured melon punch(Mocktail) Recipe in Marathi )

 • २ वाटी खरबुजाच्या मोठ्या आकारात कापलेल्या फोडी
 • २ वाटी कलिंगडाच्या मोठ्या आकारात कापलेल्या फोडी
 • अर्धी वाटी पीठीसाखर
 • एका मोठ्या लिंबाचा रस
 • अर्धा चमचा किसलेलं आलं
 • ५-६ पुदिन्याची पानं
 • पाव चमचा चाट मसाला
 • ५-६ बर्फ़ाचे तुकडे

जिंजर लेमन फ्लेवर्ड मेलन पंच(मॉकटेल) | How to make Ginger lemon flavoured melon punch(Mocktail) Recipe in Marathi

 1. प्रथम ज्युसर जार मध्ये किंवा मोठ्या मिक्सरच्या भांड्यात कलिंगड व खरबुजाच्या फोडी टाकून त्याचा ज्यूस बनवून घ्यावा.
 2. नंतर हा ज्यूस एका भांड्यात गाळून त्यात पुदिन्याची पानं कुस्करून टाकावेत व ज्यूस फ्रिज मध्ये थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवावा.
 3. तोपर्यंत एका पॅन मध्ये साखर,साखरेएवढचं पाणी आणि आल्याचा किस टाकून गुलाबजाम ला करतो त्या कंसिस्टंसी चा पाक तयार करून घ्यावा.
 4. पाक तयार होत आला की त्यात लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून सिरप एका बाऊल मध्ये काढून घ्यावे.
 5. नंतर एका ग्लास मध्ये २-३ बर्फाचे तुकडे,चाट मसाला,थोडं जिंजर-लेमन सिरप टाकून तयार मॉकटेल ग्लास मध्ये ओतावं.
 6. गार्निशिंग साठी वरून २-३ पुदिन्याची पानं ठेवावी व थांडगार जिंजर-लेमन फ्लेवर्ड मेलन पंच चा आनंद घ्यावा.

My Tip:

आवडत असल्यास कलिंगड व खरबुजाचे बारीक तुकडेही ह्यात वापरू शकता.आल्याचा किस वापरण्या ऐवजी आल्याचा रसही वापरू शकता.

Reviews for Ginger lemon flavoured melon punch(Mocktail) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo