फ्रुटी पाणीपुरी चाट | Fruity panipuri chat Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  25th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruity panipuri chat recipe in Marathi,फ्रुटी पाणीपुरी चाट, Archana Chaudhari
फ्रुटी पाणीपुरी चाटby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

About Fruity panipuri chat Recipe in Marathi

फ्रुटी पाणीपुरी चाट recipe

फ्रुटी पाणीपुरी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruity panipuri chat Recipe in Marathi )

 • संतरा बारीक कापलेले १/२ वाटी
 • किवी बारीक कापलेली १/२ वाटी
 • आंबा बारीक कापलेला १/२ वाटी
 • केळं बारीक कापलेल १/२ वाटी
 • टरबूज बारीक कापलेल १/२ वाटी आणि २ वाटी
 • लिची १० बारीक कापलेल्या १/२ वाटी
 • तयार पाणीपुरीच्या पुऱ्या १ संपूर्ण पॅकेट
 • तयार कोणताही केकचा चुरा(व्हॅनिला,चॉकोलेट, इ.)
 • किसलेले चॉकोलेट १मोठा चमचा
 • व्हिपिंग क्रीम १ कप
 • पायपिंग बॅग १
 • पाणी ४ ग्लास

फ्रुटी पाणीपुरी चाट | How to make Fruity panipuri chat Recipe in Marathi

 1. सगळी फळे चौकोनी आकारात बारीक बारीक कापून घ्या.
 2. ऐका मोठया भांड्यात ४ ग्लास पाण्यात २वाट्या बारीक कापलेले तरबूज टाकून ज्यूस बनवून घ्या.
 3. आता वरील ज्यूस मध्ये लीचीचे बारीक केलेले तुकडे घाला.लिची थोडी आंबट असते,टरबूज गोड असते म्हणून तुम्ही यात काही नाही घातले तरी चालेल.
 4. विपिंग क्रीम पायपिंग बॅग मध्ये भरून घ्या.
 5. आता तयार पाणीपुरीच्या पुरीला मधोमध अंगठ्याने फोडून,त्यात आवडणाऱ्या केक चा चुरा घाला,आता सगळे बारीक कापलेले फळे एका नंतर एक असे टाका.
 6. वरील पुरीमध्ये टरबूज आणि लीचीचे पाणी टाका, त्यावर वि प क्रीम आणि किसलेले चॉकोलेट टाका.
 7. छान फ्रुटी पाणीपुरी चाट तयार आहे.

My Tip:

तुम्ही तुमच्या आवडीचे फळे टाकू शकता. पाण्यासाठी मिक्स फ्रुट ज्यूस वापरू शकता.

Reviews for Fruity panipuri chat Recipe in Marathi (0)