Home / Recipes / Dal Dhokli

Photo of Dal Dhokli by Dhara Shah at BetterButter
1276
7
0.0(0)
0

Dal Dhokli

Feb-14-2018
Dhara Shah
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dal Dhokli RECIPE

डाळ ढोकळी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Gujarat
  • Simmering
  • Pressure Cook
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ढोकळीसाठी-
  2. १ १/२ कप गव्हाचं पीठ
  3. १/२ टीस्पून लाल तिखट
  4. १/२ टीस्पून हळद
  5. ३/४ टीस्पून मीठ
  6. आमटीसाठी-
  7. १  कप तुरीची डाळ
  8. १ मुठ शेंगदाणे
  9. १ हिरवी मिरची
  10. १/२ टीस्पून हळद
  11. १ १/२ टीस्पून लाल तिखट
  12. ३ टीस्पून गूळ
  13. १/२  टीस्पून धनेपूड
  14. १/२ टीस्पून जिरेपूड
  15. २-३ आमसुलं
  16. फोडणीसाठी-
  17. १ टेबलस्पून तूप
  18. १/४ टीस्पून मोहरी
  19. १/२ टीस्पून जिरे
  20. ३-४ लवंगा
  21. १" दालचिनीचा तुकडा
  22. ५-६ कढीपत्ता पाने
  23. १/४ टीस्पून हिंग

Instructions

  1. आमटीसाठी- कुकरमध्ये तुरीची डाळ, शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र शिजवून घ्या. डाळ शिजली कि घोटून घ्या.
  2. त्यात ६ कप पाणी घाला. हळद, तिखट,धनेपूड, जिरेपूड, गूळ, मीठ,आमसुलं घालून उकळून घ्या.
  3. फोडणीच्या कढईत तूप गरम करून आधी मोहरी घाला. मोहरी तडतडली कि जिरे आणि लवंग,दालचिनी घाला.शेवटी कढीपत्ता आणि हिंग घालून आमटीला वरून फोडणी द्या.
  4. ढोकळीसाठी- गव्हाच्या पिठात हळद, तिखट,मीठ, घालून नीट मिक्स करून घ्या. १ टीस्पून तेल (थंड मोहन) घाला आणि पुरेसे पाणी घालून पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या. १/२ तास पीठ झाकून ठेवा म्हणजे चांगले मुरेल.
  5. पीठाचे ३-४" चे गोळे करून पोळी लाटून घ्या. आणि सुरीने शंकरपाळ्यांच्या आकारात कापून घ्या. पोळी जास्ती पात्तळ लाटू नका.साधारण २-३mm जाडी ठेवा.
  6. कापलेल्या शंकरपाळ्या (ढोकळी) उकळत्या आमटीत सोडा आणि ३-४ मिनिटे उकळत ठेवा. आमटी थोडी पात्तळच करा ढोकळी गव्हाच्या  पिठाची असल्यामुळे नंतर आमटी जाड होते.
  7. बाउलमध्ये वरती तूप घालून गरम गरम डाळ ढोकळी सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE