Home / Recipes / Veg Pulao

Photo of Veg Pulao by Aarti Nijapkar at BetterButter
725
6
0.0(0)
0

Veg Pulao

Feb-23-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Veg Pulao RECIPE

भाज्यांचा पुलाव ही एक उत्तम पाककृती आहे भाज्या आणि भातात काही मसाले मिसळून हा चविष्ट पदार्थ बनतो काही जण मसाले भात सुध्दा म्हणतात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Pan fry
  • Boiling
  • Steaming
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बासमती तांदूळ १ वाटी
  2. कांदा चिरलेला १ मोठा
  3. टोमॅटो चरलेला १ मध्यम
  4. आलं, लसूण हिरवी मिरची पेस्ट १ मोठा चमचा
  5. कोथिंबीर २ मोठे चमचे
  6. पुदिना ५ ते ६ पाने
  7. हिरवे मटार १/४ वाटी
  8. फरसबी १/४ वाटी
  9. गाजर १/४ वाटी
  10. फ्लॉवर लहान तुकडे ५ ते ६ (आवडीनुसार)
  11. पनीर १/२ वाटी
  12. काजू ७ ते ८
  13. तेजपान १ ते २
  14. लवंग ४ ते ५
  15. काळीमिरी ३ ते ४
  16. दालचिनी १/२ इंच
  17. हिरवी वेलची २
  18. शाहजीरे १/२ लहान चमचा
  19. लाल तिखट १ मोठा चमचा
  20. हळद १/४ लहान चमचा
  21. धने जिरे पावडर १ लहान चमचा
  22. गरम मसाला १ लहान चमचा
  23. पावभाजी मसाला १ मध्यम चमचा
  24. मीठ चवीनुसार
  25. तूप किंवा तेल २ मोठे चमचे
  26. पाणी

Instructions

  1. तांदूळ धुवून ८ ते १० मिनिटे भिजत ठेवा
  2. मटार , कापलेले गाजर , फरसबी , फ्लॉवर धुवून घ्या पाणी निथळत ठेवा
  3. एक टोप घेऊन तेल तापवून घ्या मग त्यात तेजपान,लवंग, काळीमिरी,हिरवी वेलची,दलचिनीव काजू घालून परतवून घ्या
  4. मग उभा चिरलेला कांदा व टोमॅटो घालून परतवून घ्या आता आलं लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट घालून चांगले भाजून घ्या
  5. आता सर्व कापलेल्या भाज्या , मीठ व हळद घालून परतवून घ्या
  6. भाज्यांत लाल तिखट , पाव भाजी मसाला , धने जिरे पावडर ,गरम मसाला ,घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या व चिरलेली कोथिंबीर व पुदिना घाला
  7. आता तांदूळ घालून परतवून घ्या मग गरम पाणी गरजेनुसार घालून शिजवून घ्या
  8. पनीर वेगळ्या पॅन मध्ये तेलात परतवून घ्या म्हणजे फाटणार नाही व भातात घाला
  9. झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या तयार पुलाव वर चिरलेली कोथिंबीर घाला
  10. गरमागरम पुलाव कोशिंबीर आणि पापडसोबत खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE