Home / Recipes / Mokali Bhajani/ Mokal

Photo of Mokali Bhajani/ Mokal by Anuradha Kuvalekar at BetterButter
1445
5
0.0(0)
0

Mokali Bhajani/ Mokal

Mar-10-2018
Anuradha Kuvalekar
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mokali Bhajani/ Mokal RECIPE

थालिपीठाची भाजणी व इतर साहित्य बहुतेक सगळ्यांनकडे असते. थोडीशी आंबट-गोड अशी लागणारी व पूर्णपणे पौष्टिक व पोटभर अशी डिश. 'मोकळी भाजणी' हा प्रकार मी माझ्या वडिलांनकडून शिकले.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ३ वाट्या थालीपीठाची भाजणी
  2. चिरलेला कांदा १ वाटी
  3. चिंचेचा कोळ १/२ वाटी
  4. २-३ हिरव्या मिरच्याचे तुकडॆ
  5. कढीपत्याची ८-१० पाने
  6. गुळ २ टे. स्पून
  7. लाल तिखट १ टी. स्पून
  8. ओवा १ टी. स्पून
  9. हळद १/४ टी. स्पून
  10. मोहरी १/४ टी. स्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. हिंग थोडासा
  13. १/२ वाटी तेल
  14. खरवडलेला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीकरिता

Instructions

  1. एका भांड्यात थालीपीठ भाजणी घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, हळद, ओवा, थोडासा हिंग, गुळ, चिंचेचा कोळ व थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला. या मिश्रणात गार पाणी घालुन भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवा.
  2. कढईत/पातेलीत तेल तापवून घ्या. फोडणीत मोहरी, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कढिपत्ता व चिरलेला कांदा घालुन परतून घ्या. कांदा परतुन झाल्यावर त्यात भिजवलेल्या भाजणीचे पीठ घालुन मिश्रण एकत्र करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. कढईवर झाकण ठेवा. ५-७ मिनिटे वाफ येऊ द्या. पुन्हा एकदा ढवळा व झाकुन ठेवा. ४-५ मिनिटे पुन्हा एक वाफ द्या. (अजून एखादी वाफ मिश्रण शिजण्यास आवश्यक असेल तर द्यावी. व्यवस्थित शिजवून घ्या कच्चे राहणार नाही याची काळजी घ्या.)
  3. झाकण काढून मिश्रण ढवळा, कोरडे झाले की गॅस वरून खाली उतरवा.
  4. डिशमध्ये काढा वरून चिरलेली कोथिंबीर व खरवडलेला नारळ घाला मस्तपैकी एक चमचा साजुक तूप घालुन गरम गरम सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE