Home / Recipes / Wheat Flour Pizza

Photo of Wheat Flour Pizza by Archana Lokhande at BetterButter
805
6
0.0(0)
0

Wheat Flour Pizza

Mar-11-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Wheat Flour Pizza RECIPE

हा पिझ्झा गव्हाच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक पिझ्झा आहे. मुलांचा पिझ्झा खाण्याचा हट्ट असतो म्हणून मग घरातच बनवला पौष्टिक पिझ्झा.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. १ वाटी गव्हाचे पीठ
  2. १/२ चमचा बेकिंग सोडा
  3. मीठ चवीप्रमाणे
  4. १/२ चमचा साखर
  5. १ चमचा तेल
  6. २ चमचे दही
  7. आवडीप्रमाणे भाज्या
  8. पनीर
  9. चीज
  10. पिझ्झा साँस
  11. ओरिगँनो
  12. चिलीफ्लेक्स

Instructions

  1. एका भांड्यात पिठ, मीठ,साखर,सोडा,तेल आणि दही सर्व एकत्र मिक्स करा आणि थोडे पाणी घालून छान गोळा बनवून २०-२५ भिजण्यास ठेऊन द्या.
  2. तोपर्यंत भाजी कापून घेतली. पनीरचे बारीक क्युब केले.
  3. चीज किसून घेतला.
  4. नंतर बारीक गँसवर तवा तापण्यास ठेवला.
  5. भिजलेले पिठ पुन्हा मळून त्याचे मी दोन मोठे गोळे करून जाडसर (पिझ्झा बेसप्रमाणे) लाटून घेतले आणि फक्त १-२ सेकंद तव्यावर ठेवला आणि खाली काढून त्यावर साँस लावला त्यावर भाज्या, पनीर आणि चीजचा एक लेअर केला.
  6. पुन्हा टोमँटो,चीज, चिली फ्लेक्स,ओरिगँनोचा दुसरा लेअर करून ५-७ मिनीटे मध्यम आचेवर बेक केला.
  7. नंतर आवडीप्रमाणे कापून सर्व्ह केला आणि गरमा गरम पिझ्झ्यावर ताव मारला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE