Home / Recipes / Badam ganach cake sobat chocolate sauce

Photo of Badam ganach cake sobat chocolate sauce by Aarti Nijapkar at BetterButter
872
5
0.0(0)
0

Badam ganach cake sobat chocolate sauce

Mar-13-2018
Aarti Nijapkar
15 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Badam ganach cake sobat chocolate sauce RECIPE

बदाम गनाश केक म्हणजे खास मेजवानी पोट भरून जेवल्यानंतर सुद्धा खावीशी वाटणारी अशी ही तोंडाला पाणी सुटणारे पाककृती

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • American
  • Baking
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बटर २०० ग्रॅम
  2. साखर बारीक ३५० ग्रॅम
  3. अंडी ३
  4. वेनीला इसेन्स १ मोठा चमचा
  5. मैदा ३०० ग्रॅम
  6. बेकिंग पावडर १ १/२ लहान चमचा
  7. बदाम पावडर ८० ग्रॅम
  8. दूध २०० मिली
  9. चॉकलेट गनाश साठी लागणारे साहित्य
  10. डार्क चॉकलेट २०० ग्रॅम
  11. फ्रेश क्रीम १०० मिली
  12. सजावट साठी लागणारे साहित्य
  13. भाजलेले बदाम १५ ते २०
  14. पांढरे चॉकलेट वितळवलेले १/४ कप

Instructions

  1. ओवन १८०* से वर गरम करा केक टिन घ्या बटर ने किंवा तेलाने ग्रीस करा व बटर पेपर लावा किंवा मैदा शिंपडून घ्या टिन तयार करून ठेवा
  2. मैदा चालून घ्या एक भांड्यात मैदा , बेकिंग पावडर आणि बदाम पावडर एकत्र करून बाजूला ठेवून द्या
  3. आता एक भांड्यात बटर आणि साखर एकत्र बीट करून घ्या क्रीम होईपर्यंत करायचे आहे चांगलं प्लफि झालं की एकत्र करून घ्या
  4. अंडी एका भांड्यात फोडून घ्या तयार बटर च्या मिश्रणात एक एक करून घाला व व्हिस्क करून घ्या
  5. आता बदाम पावडर आणि वेनीला इसेन्स घालून एकत्र करा
  6. आता एकत्र करून घेतलेले मैदाचं मिश्रण घ्या ते अंड्याचा मिश्रणात घालून पुन्हा हलक्या हाताने व्हिस्क करून घ्या थोड थोडं दूध घालावे व मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. मिश्रण व्यवस्थित व्हिस्क करून घ्या
  8. तयार मिश्रण केक टिन मध्ये घालून गरम ओव्हन मध्ये १८०*से वर ३० ते ३५ मिनिटे बेक करून घ्या
  9. केक बेक झालं की नाही बघायला केक टेस्टर ने किंवा वूड पीक ने बघून घ्या टेस्टर साफ आले की समजा आपला केक झाला आहे
  10. तयार झालेला केक ओव्हन मधून काढा व ओव्हन बंद करा आणि केक गार करत ठेवा
  11. चॉकलेट गनाश ची कृती
  12. कुकिंग क्रीम एका खोलगट पॅन मध्ये घालून मंद आचेवर तापवून घ्या सातत्याने ढवळत राहा जेणेकरून जळणार नाही किंवा चिटकणार नाही गॅस बंद करा आता कापलेले डार्क चॉकलेट गरम क्रीम मध्ये घालून घ्या व व्हिस्क ने एकजीव करून घ्या चॉकलेट गनाश तयार होईल ह्याला थोडा वेळ सेट करून घेऊ म्हणजे साधारण तापमान होईपर्यंत
  13. आता गार झालेला केक स्पॉंज घ्या त्याचे मधून २ किंवा ३ लेअर मध्ये कापून घ्या आता पहिला स्पॉंज घेऊन त्यावर साखरेचं पाणी शिंपडून घ्या मग चॉकलेट गनाश घालून केक नाईफ ने पसरवून घ्या मग त्यावर दुसरा स्पॉंज ठेवून पुन्हा अशीच कृती करा शेवटचा स्पॉंज ला गनाश ने पूर्ण व्यवस्थित लावून घ्या आणि फ्रिज मध्ये १० मिनिटे ठेवून द्या पुन्हा गनाश ने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्या
  14. सफेद चॉकलेट बटर पेपर मध्ये घालून तयार केकवर रेषा मारून घ्या केक च्या बाजूस बदाम लावून घ्या काही वेळ फ्रिज मध्ये सेट करून घ्या
  15. सेट झालेला केक ताटात काढून ठेवा
  16. उरलेल्या गनाश मध्ये थोडा दूध घालून मंद आचेवर गरम करून घ्या मग ह्याचा चॉकलेट सॉस तयार होईल हा चॉकलेट सॉस कॅकेच्या बाजूने घाला गार झाल्यावरच घाला
  17. आणखी ५ मिनिटे फ्रिज मध्ये ठेवून सर्व्ह करा बदाम गनाश केक सोबत चॉकलेट सॉस

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE