Home / Recipes / Chicken biryani

Photo of Chicken  biryani by Neeta Mohite at BetterButter
1062
9
0.0(0)
0

Chicken biryani

Mar-25-2018
Neeta Mohite
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Indian
  • Pressure Cook
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. २०० ग्राम बासमती तांदूळ
  2. मीठ
  3. 3 टेबल स्पून तेल
  4. छोटे कांदे (बारीक चिरून)
  5. मध्यम कांदे (बारीक चिरून)
  6. लसणीच्या पाकळ्या (बारीक चिरून)
  7.  २ tsp किसलेले आले
  8. चीकन ब्रेस्ट फिले किंवा २ चिकन ब्रेस्ट…लांबट कापून घेणे( चिकन फिले हे चिकन ब्रेस्ट च्या   आतील बाजूस असलेले मांस….काही सुपर स्टोर्स मध्ये उपलब्ध असते.)
  9. १ tsp लाल तिखट
  10. १ tsp जिरेपूड
  11.  २ tsp धने पूड
  12. अर्धा चमचा दालचिनी पूड
  13. अर्धा चमचा हळद
  14. चिमुट भरून जायफळ पूड
  15. ३/४ कप साधे दही
  16. २ (चहाचे) चमचे पिठी साखर
  17.  ४,५ मुठी बेदाणे

Instructions

  1. स्वच्छ पाणी येईपर्यंत तांदूळ धुवून घ्यावेत व थोड्या पाण्यात मीठ घालून ३० मिनिटे भिजू द्यावेत.
  2. त्यानंतर तांदळातील पाणी निथळून त्यांना एका पातेल्यात पाण्यात बुडवून ठेवावे. पाणी तांदळाच्या वर २ से.मी./ ३/४ इंच तरी असावे.
  3. आता हे तांदूळ घातलेले पातेले तापत ठेवावे. पाण्याला उकळी आली कि मंद आंचेवर झाकून भात १० मिनिटे शिजू द्यावा. भातात भोके दिसू लागतील सर्व पाणी शोषले जाईल .
  4. आता फ्राईंग पॅन मध्ये तेल तापवा त्यात चिरलेले छोटे कांदे, मोठे कांदे ,लसूण आणि आले घालून सोनेरी रंगावर परता. यातील चमचाभर मिश्रण सजावटी करता बाजूला काढून ठेवा.
  5. आता चिकन घालून ते ४ मिनिटे परता .
  6. आता सर्व मसाले घालून १ मिनिट परता . आता त्यात दही मिसळून १-२ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. आता त्यात साखर, बेदाणे व अर्धवट शिजलेला भात मिसळा. आता हे पॅन स्वच्छ टी टॉवेल ने झाकून त्यावर घट्ट झाकण लावावे. (यामुळे वाफ आतच राहिल)
  7. अशा रीतीने १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे .
  8. आंच बंद करून ५ मिनिटे तसेच राहू द्यावे.
  9. बाजूला काढून ठेवलेल्या कांद्याच्या मिश्रणाने सजवून बिर्याणी सर्व्ह करा (वाढा).

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE