Home / Recipes / Fulgobi Fries with White Sauce

Photo of Fulgobi Fries with White Sauce by Archana Lokhande at BetterButter
592
4
0.0(0)
0

Fulgobi Fries with White Sauce

Mar-25-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Fulgobi Fries with White Sauce RECIPE

आपल्यापैकी बरेच जण फ्लावर खातो. पण आपण फक्त त्याची फुल खातो आणि ज्यात जास्त प्रमाणात जीवनसत्त्व, पोषक घटक असतात ते फेकून देतो. म्हणजेच आपण जो कट्टू ज्याला ती पान असतात तो भाग फेकून देतो. आज मी त्याच कट्टू त्यापासून एक नवीन रेसिपी करणार आहे.तर चला पाहू रेसिपी आणि हो कशी वाटली माझी डिश

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Boiling
  • Frying
  • Appetizers
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. १ किलो फ्लावरचा कट्टू
  2. दुध १/४ वाटी
  3. ब्रेडक्रम्स १ वाटी
  4. बटर २ चमचे
  5. काळी मिरेपूड १ चमचा
  6. आल-लसूण पेस्ट १ चमचा
  7. हिरवी मिरची २ बारीक चिरलेली
  8. मैदा ६ चमचे
  9. चाट मसाला १ चमचा
  10. लाल तिखट १/२ चमचा
  11. काळ मीठ १/२ चमचा
  12. मीठ चवीप्रमाणे
  13. तेल

Instructions

  1. प्रथम फ्लावरच्या कट्टूची जो पान/देढ भाग असतो सर्व कापून वेगळे करा.
  2. स्वच्छ धुवून असे कापून घ्या.
  3. हे काप थोडे पाणी गरम करून त्यात फक्त ५ मिनिटे वाफलून घ्या आणि पाण्यातून बाजूला काढून ठेवा.
  4. आता एका बाऊलमध्ये वाफवलेले काप,मिरेपूड, काळं मीठ, मीठ,आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, चाट मसाला आणि मैदा घालून एकत्र नीट मिसळून घ्यावे.
  5. कढईत तेल गरम करत ठेवावे.
  6. आता तयार फ्राईस ब्रेड क्रम्समध्ये घोळवून.
  7. तेल गरम झाल्यावर फ्राईस कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत.(प्रथम २ मिनिटे हाय फ्लेमवर आणि लो फ्लेमवर तळून घ्यावेत).
  8. तोपर्यंत आपण व्हाईट साँस बनवून घेऊ. त्यासाठी एका पँनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये २ चमचे मैदा,दुध, मीठ आणि लाल तिखट घालून त्याच्या साँस तयार घ्यावा.
  9. तयार साँस बरोबर फुलगोबी फ्राईस सर्व्ह करावेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE