Home / Recipes / Chicken Biryani

Photo of Chicken Biryani by Neeta Mohite at BetterButter
857
9
0.0(0)
0

Chicken Biryani

Mar-25-2018
Neeta Mohite
0 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Hyderabadi
  • Boiling
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. १ किलो चिकन 
  2. ३ टेबल स्पून दही 
  3. २ टीस्पून (आल +लसून + ३ हिरव्या मिरच्या + पुदिना) पेस्ट
  4. १/२ टीस्पून हळद 
  5. १ टीस्पून लाल तिखट 
  6. १/२ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर
  7. किंचित मीठ 
  8. भातासाठी साहित्य : 
  9. ३ कप बासमती तांदूळ
  10. २ टीस्पून तूप
  11. ३-४ काळी मिरी
  12. ३-४ लवंग
  13. १- कांडी दालचिनी
  14. ३- तमालपत्र
  15. २ १/२ कप पाणी
  16. मीठ चवीपुरते  
  17. तळण्यासाठी साहित्य :
  18. ४-५ टेबलस्पून तेल 
  19. ३-४ कांदे उभे चिरून 
  20. ३ बटाटे बारीक कापून 
  21. काजूचे तुकडे (आवडीनुसार)
  22. फोडणीसाठी साहित्य :
  23. तेल\तूप
  24. खडा मसाला (२-मोठी वेलची, १-२ कांडी दालचिनी,१ चक्रीफुल),१/२ टीस्पून गरम मसाला पावडर 
  25. २-३ Tomato बारीक कापलेला,
  26. १/२ टीस्पून लाल तिखट
  27. २ कांदे बारीक कापलेले 
  28. थरासाठी (For Layers) साहित्य :
  29. एका लिंबाचा रस 
  30. १/२ कप कोमट दूध + किंचित केशर (१०-१५ मिनिटे ठेवाव.दूधाला रंग येण्यासाठी)
  31. १-२ टीस्पून चाट मसाला 
  32. बटर/तूप (आवडीनुसार)

Instructions

  1. प्रथम चिकन धुऊन, १ तास चिकन वरील Marinade साहित्यांनी Marinade करून ठेवा 
  2. नंतर भात अर्धवट कुकरमध्ये शिजवून घेणे(साधारण १ शिट्टी ).शिजवताना त्यात लवंग, मिरी, दालचिनी,तमालपत्र, किंचित मीठ, तूप, पाणी टाकणे. भात शिजवल्यावर ५ मिनिटांनी कुकर उघडून पसरट भांडयात पसरून भात मोकळा करा.(Fan फास्ट करून ठेवल्यास उत्तम)
  3. एका कढईत तेल तापवून कांदा, बटाटेचे तुकडे, काजूचे तुकडे वेगवेगळे फ्राय करून घ्या.टिशू पेपरवर ठेवा
  4. नंतर त्याच तेलाचा वापर करून (आवडत असलास) नसेल तर दुसर तेल किंवा तूप घ्या.त्यात खडा मसाला टाका. मग त्यात बारीक कापलेला कांदा टाकून परता. कांदा गुलाबी झाला कि त्यात Tomato,लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ टाकून परता. ५ मिनिटांनी त्यात चिकन टाका. पुन्हा डावने मिश्रण ढवळा.
  5. झाकण ठेवून १० मिनिटानी त्यात पाणी टाकून १० मिनिटे ठेवा.चिकन जास्त ड्राय (Dry) नको आहे. 
  6. एका जाड बुडाच्या पातेलात (पातेले खोलगट असावे) प्रथम भाताचा थर (layer) देऊन त्यावर किंचित मीठ भुरभुरा, एक टीस्पून तूप /बटर,एक टीस्पून केशर +दूध  पण सगळ्या भातावर टाका.
  7. नंतर त्यावर चिकनचा थर (layer) देऊन त्यावर पुन्हा भाताचा थर (layer) दया(same as above)वरील प्रणाने मीठ आणि बटर /तूप,केशर +दूध टाका. 
  8. आता फ्राय कांदा,बटाटे चा थर (layer) दया त्यावर किंचित मीठ, चाट मसाला भुरभुरा.नंतर पुन्हा भातचा थर,किंचित मीठ,केशर दूध,बटर/तूप टाका. चिकनचा थर (layer) दया.
  9. शेवटी भाताचा थर (layer) त्यावर मीठ, बटर, १ टीस्पून लिंबूचा रस,केशर दुध,काजू टाका.नंतर उलटणी उलटी करून त्याच्या साह्याने उभी छिद्र  (Vertical hole) पाडा भाताला, त्या प्रत्येक छिद्रात उरलेले एक-एक टीस्पून लिंबू रस,केशर,बटर.तूप,चिकन ग्रेव्ही टाका.(ग्रेव्ही कमी असेल तर त्यात थोड पाणी टाकून एक उकळी आण आणि मग ते पाणी त्या प्रत्येक छिद्रात टाका) कारण भात अर्धवट शिजलेला असतो.
  10. पातेल्यावर झाकण ठेवून त्याचा कड्या भिजवलेल्या कणकेने बंद करा म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही.मंद आचेवर २०-२५ मिनिटे भात शिजवा.
  11. कोथिबीर,फ्राय कांदा टाकून सजवा व कोशिंबीर सोबत सर्व्ह करा. उकडलेली अंड्याचे काप करून सुद्धा सजावट करता येईल.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE