Home / Recipes / Stuffed potato Fry

Photo of Stuffed potato Fry by Aarti Nijapkar at BetterButter
578
6
0.0(0)
0

Stuffed potato Fry

Apr-19-2018
Aarti Nijapkar
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Stuffed potato Fry RECIPE

स्टफड बटाटा फ्राय ही एक खूप छान पाककृती आहे मजा म्हणजे ह्याच्यात आपल्याला आवडीचे सारण भरू शकतो व्हेज , नॉनव्हेज इत्यादी थोडी मेहनत घ्यावी लागेल पण खाण्यास खूप चविष्ट आणि वेगळी अशी ही पाककृती आपण बघुयात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Frying
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. उकडलेले बटाटे अकखे ४ ते ५
  2. भरणासाठी
  3. गाजर बारीक चिरलेली १/३ वाटी
  4. सिमला मिरची बारीक चिरलेली १/४ वाटी
  5. कांदा बारीक चिरलेला १ लहान आकाराचा
  6. हिरवी मिरची चिरलेली १
  7. कोथिंबीर २ मोठे चमचे
  8. लाल तिखट १ लहान चमचा
  9. गरम मसाला १/२ लहान चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. आवरणासाठी
  12. ब्रेड क्रम्ब १ वाटी
  13. मैद्याची पेस्ट १/२ वाटी
  14. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. बटाटे पाण्याचे उकडून घ्या मग गार झाल्यावर त्याचे साल काढून घ्या
  2. आता सॉसपन किंवा कढई घ्या त्यात थोडे तेल घाला मग कांदा व गाजर परतवून घ्या मग सिमला मिरची व हिरवी मिरची घाला व हलके परतवून घ्या
  3. मग लाल तिखट , गरम मसाला , मीठ घालून मिश्रण एकत्र परतवून घ्या मग चिरलेली कोथिंबीर घाला मग गॅस बंद करा तयार मिश्रण गार करत ठेवा
  4. आता उकडलेल्या बटाट्याचे मधून २ भाग करा आणि आतल्या बाजूने बटाट्याचे खोलगट चमच्याने भाग काढा म्हणजे त्यात मिश्रण भारत येईल
  5. सर्व बटाटे आतून मध्यम थोडेसे खोलगट करून घ्या
  6. तयार मिश्रण बटाट्यांमध्ये भरा बटाटे बंद करा न मधोमध वूड स्टिक लावा सर्व ह्या प्रकारे तयार करून घ्या
  7. आता मैद्यात पाणी घाला त्याची चांगली पेस्ट तयार करा एका थाळीत ब्रेड क्रम्ब घ्या
  8. भरलेले बटाटे आधी मैद्याच्या पेस्ट मध्ये घोळवून घ्या मग ब्रेड क्रम्ब मध्ये घोळवून घ्या अश्या प्रकारे सर्व बटाटे तयार करून घ्या
  9. आता कढईत तेल तापवून घ्या मग मध्यम आचेवर सर्व बटाटे तळून घ्या
  10. दोन्ही बाजूने लालसर झाले पाहिजे
  11. बटाटे टाळून झाल्यावर हव्यास स्टिक काढून टाका गरमागरम स्टफड बटाटे फ्राय सॉस किंवा चटणी सोबत खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE