Home / Recipes / stuffed veg dhemse

Photo of stuffed veg dhemse by Seema jambhule at BetterButter
1405
4
0.0(0)
0

stuffed veg dhemse

Apr-20-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT stuffed veg dhemse RECIPE

ढेमसे ही भाजी उन्हाळ्या मध्ये भाजी मार्केट मध्ये येते. ढेमसे हे आरोग्यास थंड असताते... स्टफ वेज ढेमसे या भाजीत स्टफ्फींग साठी बटाटे , दुधी भोपळा , शिमला मिर्च ,दोडका आणि ढेमसे यांची भाजी करून स्टफ केल आहे.. त्या मुळे वेगळ अशी चव वाटते आणि भाजी बारीक चिरून वापरले मुळे समजून पण येत नाही..

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ढेमसे 1 पाव
  2. दुधीभोपळा 1/2 वाटी किस
  3. 1 बटाटाचा किस
  4. 1 शिमला मिर्ची
  5. मोहीरी जिरे 1 प्रत्येकी 1/2 चमचा
  6. 1 दोडका
  7. शेंगदाणा कूट पाव वाटी
  8. लसूण अद्र्क पेस्ट 1चमचा
  9. धने जिरे पावडर 1 चमचा
  10. 1 टमाटर
  11. 1 कांदा
  12. कोथिंबीर
  13. मीठ चवीनुसार
  14. हळद 1/4 चमचा
  15. तिखट 2 1/2 चमचा
  16. गोडा मसाला 1चमचा
  17. तेल
  18. खोबर अणि कांदा भाजून केलेला वाटण 1 चमचा

Instructions

  1. ढेमस धून शिलून घ्या व वरून थोड कापा व त्यातील बिया कडून टाका..
  2. सर्व भाज्या धून घ्या व बटाटा आणि दोडका शिलून घ्या
  3. बटाटा आणि भोपळा किसुन घ्या आणि सर्व भाज्या बारीक कापून घ्या.
  4. एका भांडयात तेल गरम करा तेल गरम झाल कि जिरे मोहीरी टाका नंतर कांदा टाकून परतून घ्या.
  5. नंतर लसूण अद्र्क पेस्ट टाका व परता त्यात टमाटर तिखट , मीठ , हळद , धने जिरे पावडर आणि थोडा गोडा मसाला टाकून परता
  6. नंतर सर्व कापलेला भाज्या टाका व शेंगदाणा कूट टाकून परता व 5-6 मिनट आचेवर शिजू द्या शिजली कि वरून कोथिंबीर टाका
  7. आता तयार केलेली भाजी सर्व ढेमसे मध्ये n भरा..
  8. आता एका भांड्यात तेल गरम झाले कि कांदा टाका कांदा लाल झाला कि लसूण पेस्ट व कांदा खोबरे भाजून केलेले वाटण टाकून परता नंतर थोडे तिखट मीठ हळद आणि जिरे पावडर व गोडा मसाला टाकून 1 मिनट परता.
  9. नंतर त्या मसाला मध्ये स्टफ केलेली ढेमसे टाका व परता नंतर थोड पाणी टाकून त्यावर झाकण ठेवा व ढेमसे शिजू द्या
  10. स्टाफ वेज ढेमस चपाती किवां भाकरी सोबत खा ..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE