Home / Recipes / Mango Kalakand

Photo of Mango Kalakand by Nayana Palav at BetterButter
955
15
0.0(0)
0

Mango Kalakand

May-15-2018
Nayana Palav
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mango Kalakand RECIPE

आपण एकदम १ किंवा २ डझन आंबे आणतो. एवढे आंबे एकदम खाल्ले जात नाही. काही दिवसांनी ते खराब होतात. अशावेळी आंब्याचे पदार्थ बनवून, फ्रिजमध्ये ठेवले. तर खूप दिवस टिकतात. व आपले नुकसान होत नाही. मी पण कलाकंद बनवून फ्रिजमध्ये ठेवले. कधीही खाता येतात, कोणी पाहूणे आले, तर त्यांना पण देता येतात. पाहुणे पण खुश. चला तर कलाकंद घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Fusion
  • Blending
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. आंब्याचा गर ३ मध्यम आंबे
  2. पनीर २०० ग्राम
  3. साखर १/२ कप (आवश्यकतेनुसार)
  4. तूप १ टीस्पून (थाळीला लावण्यासाठी)
  5. वेलचीपूड १/४ टीस्पून
  6. पिस्ता कापलेला १ टेबलस्पून
  7. थाळी १

Instructions

  1. आंबे धूवून, सोलून, कापा.
  2. ब्लेंडरच्या साहाय्याने आंब्याचा गर ब्लेंड करा.
  3. एक नाॅनस्टिक कढई गॅसवर ठेवा.
  4. त्यात आंब्याचा गर घालून परतून घ्या.
  5. आता पनीर घाला.
  6. आता साखर घाला.
  7. नीट मिक्स करा.
  8. चमच्याने ढवळत रहा.
  9. मिश्रण गोळा झाले की गॅस बंद करा.
  10. थाळीला तूप लावून हे मिश्रण थाळीत ओता.
  11. थंड झाल्यावर यांच्या वड्या पाडा.
  12. पिस्त्याने सजवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE