Home / Recipes / Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle

Photo of Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle by Sudha Kunkalienkar at BetterButter
1167
5
0.0(0)
0

Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle

May-18-2018
Sudha Kunkalienkar
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle RECIPE

कैरीच्या लोणच्याचा जरा वेगळा प्रकार हवा असेल तर हा कायरस नक्की करून पहा. अगदी झटपट होणारा आणि घरात नेहमी असणारं साहित्य वापरून केलेलं हे आंबट गोड लोणचे सगळ्यांना आवडेल.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Simmering
  • Sauteeing
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. कैरीच्या फोडी  दीड  कप
  2. चिरलेला गूळ दीड कप 
  3. सुक्या लाल मिरच्या २ मध्ये चीर देऊन 
  4. लाल तिखट अर्धा चमचा 
  5. तेल १ मोठा चमचा 
  6. मोहरी पाव चमचा 
  7. हळद पाव चमचा 
  8. हिंग ३-४ चिमूट
  9. मेथी दाणे ८-१०
  10. मीठ चवीनुसार 

Instructions

  1. कैरी धुवून, सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करा. 
  2. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग, लाल मिरच्या आणि मेथी दाणे घालून खमंग फोडणी करा. 
  3. फोडणीत कैरीच्या फोडी घाला. मंद आचेवर झाकण ठेवून वाफवून घ्या. 
  4. कैरी जरा नरम झाली की फोडी बुडतील एवढं पाणी घाला आणि एक उकळी आणा. 
  5. त्यात गूळ, तिखट आणि मीठ घालून मंद आचेवर शिजवा. चवीप्रमाणे गूळ कमी/जास्त करा.  
  6. कैरी शिजली की गॅस बंद करा. 
  7. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून फ्रिज मध्ये ठेवा. कायरस एक आठवडा फ्रिज मध्ये राहतो
  8. पोळी, पराठा, ठेपला, भाकरी बरोबर हा आंबट गोड कायरस सर्व्ह करा. 

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE