BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याचे शिकरण

Photo of Banana Shikran by Sujata Hande-Parab at BetterButter
0
7
0(0)
0

केळ्याचे शिकरण

May-31-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्याचे शिकरण कृती बद्दल

हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला "केळीचे शिकरण" असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त चिबूड वापरून देखील बनविले जाते. अगदी लवकर बनणारे, हेलथी, चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारे असे हे शिकरण महाराष्ट्रात प्रत्येक घरात खूप आवडीने खाल्ले जाते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. केळी – 2 हिरव्या जातीची पिकलेली , बारीक काप केलेले
  2. थंड दूध – १ १/२ कप
  3. साखर किंवा पिठी साखर - १ टेबलस्पून चवीनुसार कमी जास्त करू शकता
  4. वेलची पूड - १/२ टीस्पून
  5. बदाम सोललेले आणि बारीक काप केलेले - १ १/२ टेबलस्पून
  6. सजावटीसाठी - चेरीज

सूचना

  1. १/४ भाग केळीचे बारीक तुकडे करून घ्या. चमचा किंवा मॅशरचा वापर करून मॅश करा.
  2. एका खोल बाउलमध्ये दूध घ्या. साखर घालावे. साखर वितळेपर्यंत चांगले मिक्स करावे.
  3. त्यात ३/४ भाग पातळ काप केलेली केळी आणि १/४ भाग मॅश केळी घालावे. चांगले ढवळा.
  4. वेलची पूड आणि पातळ काप केलेले बदाम घालून मिक्स करावे. चांगले ढवळा.
  5. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. थंडगार किंवा तत्काळ सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर