क्रीमि आंबा कस्टर्ड फ्लोट | Mango Custard Float Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Custard Float recipe in Marathi,क्रीमि आंबा कस्टर्ड फ्लोट, Sujata Hande-Parab
क्रीमि आंबा कस्टर्ड फ्लोटby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  8

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

क्रीमि आंबा कस्टर्ड फ्लोट recipe

क्रीमि आंबा कस्टर्ड फ्लोट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Custard Float Recipe in Marathi )

 • हापूस आंबा - 2 ताजे आणि गोड (बात काढून एकदम पातळ काप केलेले)
 • ब्रिटानिया न्यूटि चॉईस क्रॅकर बिस्किट्स - 12-15 
 • दूध - 250 मिली
 • फुल्ल फॅट क्रीम - 1/4 कप
 • साखर - 2-3 चमचे.
 • कस्टर्ड पावडर - 2 टीस्पून 
 • बदाम - 8-9 बारीक केलेले(पर्यायी) 
 • गुड डे बिस्किटे - 4 (पर्यायी)
 • सजावट - चॉकलेट सिरप आंबा पल्प

क्रीमि आंबा कस्टर्ड फ्लोट | How to make Mango Custard Float Recipe in Marathi

 1. आंबा सोलून पातळ गोल आकारात कापून घ्या.
 2. पॅन गरम करा. दूध उकळून साखर घालावी.
 3. एका वाडग्यात १/४ कप दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर घालावी. चांगली एकत्र करून घ्यावी.
 4. हे मिश्रण उर्वरित दूध मध्ये टाका. सतत ढवळत राहावे. 2-3 मिनिटे शिजवा.
 5. थंड करावे. नंतर फुल फॅट क्रीम टाकावी आणि मिक्स करावी.
 6. एक ट्रे किंवा चोकोनी टिन घ्या. ब्रिटानिया न्यूटि चॉईस क्रॅकर बिस्किट्स चा थर खाली लावून घ्या.
 7. कस्टर्ड-क्रीम मिक्सरचा एक थर पसरवा. कापलेले बदाम पसरवा पुढील थर हा गोलाकार कापलेला आंब्यांचा असेल.
 8. ही प्रक्रियेची दुसऱ्यांदा पुनरावृत्ती करा. आवश्यक असल्यास तिसऱ्या वेळी देखील करा.
 9. 4 बिस्किटे घ्या (मी गुड डे बिस्किटे वापरली). क्रश करा. गोड नसलेले कोको पावडर घाला (वैकल्पिक) चांगले मिक्स करा आणि टॉप वर पसरवा.
 10. रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा.
 11. सर्व्हिंग करण्यापूर्वी किमान 5-6 तास सेट करा. थंडगार सर्व्ह करा.

My Tip:

बिस्किटे घरी सहज उपलब्ध असतात. ग्रॅहम क्रॅकर्सला मारी बिस्किटे किंवा इतर कोणत्याही पाचक बिस्किट्स शी बदलू शकतो.

Reviews for Mango Custard Float Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती