मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच

Photo of Egg Omelette Cheese Grilled Sandwich by Sujata Hande-Parab at BetterButter
0
3
0(0)
0

अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच

Jun-04-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच कृती बद्दल

सँडविच मध्ये विशेषत: भाजी, चीज किंवा मीट असते. ब्रेड एकतर साधी असू शकते किंवा मेयोनेझ किंवा मोहरी चा सौस घालून त्याचा स्वाद आणि टेक्सर वाढविता येतो. सँडविच भारतात खूप लोकप्रिय आहे आणि विविध प्रकाराने तयार केले जाते. या कृती मध्ये मी अंड्याचे ओमलेट वापरले आहे.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • सिमरिंग
 • व्हिस्कीन्ग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. अंडी - 2
 2. कांदा मध्यम - १/२ बारीक चिरून
 3. टोमॅटो - १/२ मध्यम बारीक चिरलेला (बियाणे आणि लगदा काढून घेतलेला)
 4. बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - १ टेबलस्पून 
 5. हळद पावडर - १/२ टिस्पून
 6. गरम मसाला - १/२ टिस्पून
 7. काळी मिरी - १/२ टिस्पून बारीक कुटलेली 
 8. लाल तिखट - १/४ टिस्पून
 9. मीठ चवीनुसार
 10. तेल - १/२ टेबलस्पून 
 11. सैंडविच ब्राउन पाव - 4 काप
 12. चीज काप - 2
 13. टोमॅटो स्लाइस - १ टोमॅटो 
 14. मेयोनीज - 1 टेबलस्पून (पर्यायी)
 15. बटर - 1-2 टेबलस्पून 

सूचना

 1. एका खोल बाउलमध्ये अंडी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिठ, गरम मसाला, लाल मिरची पूड, काळी मिरी पूड आणि हळद घेऊन चांगले फेस येईपर्यन्त विस्क करा.
 2. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. तयार अंडे मिश्रण घालावे समानप्रकारे पसरवा कमी मध्यम गॅस वर बाजू सोडेपर्यंत शिजवून घ्या.
 3. ते पलटी करा आणि दुसऱ्या बाजूला 1 मिनिटासाठी शिजू द्या. हे 2-3 चोकोनी भागात विभागून घ्या.
 4. ब्राऊन ब्रेड च्या तुकड्यावर बटर पसरवून घ्या.
 5. मेयोनेज पसरवा
 6. ब्रेड वर चीज चे स्लाईस आणि ओमलेट ठेवा.
 7. वर काही टोमॅटोची कापे व्यवस्थित लावून घ्या. दुसर्या बटर केलेल्या ब्रेड स्लाईसने झाकून घ्या.
 8. त्यांना इलेक्ट्रिक किंवा कोणत्याही हातातील सँडविच मेकरमध्ये ग्रिल करा
 9. कापून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर