BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रील भूर्जी पाव

Photo of Grilled Bhurji Paav by Aarti Nijapkar at BetterButter
0
4
0(0)
0

ग्रील भूर्जी पाव

Jun-17-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रील भूर्जी पाव कृती बद्दल

भूर्जी पाव सर्वांच्या परिचयाची आहेच झणझणीत भूर्जी करून पाव ग्रील पॅन मध्ये मस्त बटर चा मारा करून ग्रील करू मग पाव च्या आत टमाटर आणि कांद्याचे मस्त गोलसर काप करू ठेवू आणि तयार मसाला भूर्जी पावाच्या आत ठेवून सर्व्ह करू, नेहमी पेक्षा वेगळी आणि आकर्षक काही तरी करू, चला तर मग

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडी ३
  2. कांदे बारीक चिरलेले २ मोठे
  3. टमाटर बारीक चिरलेले १ मध्यम
  4. आलं लसूण पेस्ट १/२ लहान चमचा
  5. हिरवी मिरची १
  6. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
  7. तेल १ मोठा चमचा
  8. जिरे १/४ लहान चमचा
  9. हिंग चिमूटभर
  10. लाल तिखट १ मोठा चमचा
  11. धने पाउडर १/२ लहान चमचा
  12. जीरा पावडर १/२ लहान चमचा
  13. गरम मसाला १/२ चमचा
  14. बिर्याणी मसाला १/४ लहान चमचा
  15. पाव ४
  16. बटर २ मोठे चमचे
  17. कांदा रिंग मध्ये कापलेले
  18. टमाटर रिंग मध्ये कापलेले

सूचना

  1. कढईत तेल घालून तापवून घ्या
  2. त्यात जिरे घाला व तडतडू द्या मग हिंग घाला
  3. आता चिरलेला कांदा , टमाटर , हिरवी मिरची , चवीनुसार मीठ व हळद मध्यम आचेवर घालून लालसर परतवून घ्या
  4. आता लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर , बिर्याणी मसाला घालून मिश्रण परतवून घ्या थोडंस पाणी घाला व मिश्रण मसाला एकजीव करून घ्या
  5. आता अंडी एका बाउल मध्ये फोडून घ्या
  6. तयार मसाल्याच्या मिश्रणामध्ये अंडी न फेटता घाला व गॅस मंद करून मिश्रण एकजीव करून घ्या
  7. झाकण ठेवून १ ते २ मिनिटे वाफवून घ्या
  8. चिरलेली कोथिंबीर घालून भूर्जी एकजीव करुन घ्या व गॅस बंद करा
  9. ग्रील पॅन तापवून त्यावर बटर घालून पाव गरम करून घ्या
  10. पाव मध्ये रींग कांदा टमाटर घालून त्यावर तयार भूर्जी घाला
  11. आता गरमागरम मस्त ग्रील भूर्जी पाव खाण्यास न सर्व्ह करण्यास तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर