गाजर कार्बोनारा नूडल्स | Carrot Carbonara noodles Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Carrot Carbonara noodles recipe in Marathi,गाजर कार्बोनारा नूडल्स, Aarti Nijapkar
गाजर कार्बोनारा नूडल्सby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

गाजर कार्बोनारा नूडल्स recipe

गाजर कार्बोनारा नूडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Carrot Carbonara noodles Recipe in Marathi )

 • नूडल्स १/२ कप
 • गाजर कापलेले १/३ कप
 • लसूण पाकळ्या २
 • कोथिंबीर १ चमचा
 • फ्रेश क्रीम १ मोठा चमचा
 • काळीमिरी १ लहान चमचा
 • चिली फ्लेक्स १/२ लहान चमचा
 • ढोबळी मिरची बारीक कापलेले २ मोठे चमचे
 • मीठ स्वादानुसार
 • बटर १ मोठा चमचा
 • चीझ १ मोठा चमचा

गाजर कार्बोनारा नूडल्स | How to make Carrot Carbonara noodles Recipe in Marathi

 1. पाणी गरम करून उकळी आली की त्यात मीठ व तेल घाला मग नूडल्स घालून अर्धे उकळवून घ्या व गार पाण्याखाली धरून ते एका चाळणीत ठेवून द्या
 2. आता मिक्सर च्या जार मध्ये गाजर , लसूण पाकळ्या , कोथिंबीर ,फ्रेश क्रीम , काळीमिरी घालून पेस्ट बनवून घ्या
 3. आता गॅस वर पॅन गरम करून त्यात बटर घाला व लगेच तयार पेस्ट घाला व परतवून घ्या
 4. चिली फ्लेक्स , ढोबळी मिरची कापलेली घाला व परतवून घ्या
 5. थोडा पाणी घालून घ्या व मिश्रण एकजीव करून घ्या
 6. चवीनुसार मीठ घाला नूडल्स घाला व मिश्रण एकजीव करून घ्या
 7. चीझ किसून घाला
 8. गरमागरम गाजर कार्बोनारा नूडल्स तयार आहे

My Tip:

आवडीनुसार भाज्या घालू शकता

Reviews for Carrot Carbonara noodles Recipe in Marathi (0)