चणा डाळीची वडी | Chana Daal Vadi Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chana Daal Vadi recipe in Marathi,चणा डाळीची वडी, Priti Tara
चणा डाळीची वडीby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

चणा डाळीची वडी recipe

चणा डाळीची वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana Daal Vadi Recipe in Marathi )

 • १ कप चणाडाळ ,
 • ५ ते ६ हिरव्या मिरच्या,
 • ८ ते १० लसूण पाकळ्या ,
 • १ इंच आले ,
 • १० ते १५ कढीपत्ता पाने,
 • १/२ टिस्पून हळद,
 • १ टिस्पून जीरे ,
 • १ टिस्पून तीळ ,
 • १/२ कप कोथिंबीर बारीक चिरून,
 • चवीपुरते मिठ
 • * चटणी साठी साहित्य :
 • १वाटी ओल खोबर ,
 • हिरवी मिरची २-३,
 • कोथिंबीर
 • एक पाकळी लसूण ,
 • चवीनुसार मीठ

चणा डाळीची वडी | How to make Chana Daal Vadi Recipe in Marathi

 1. चणा डाळ धुवून घ्यावी. नंतर २ ते ३ तास भिजवावी. चाळणीत ओतून पाणी निथळून टाकावे. डाळ तशीच अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निघून जाईल.
 2. २) मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या (मोडून), आले लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
 3. ३) वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जीरे घालून मिक्स करावे.
 4. ४) चटणीच साहित्य एकत्रित मिक्सरमध्ये वाटून चटणी बनवून घ्यावी .
 5. एक सुती कापड पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्याव. ते अंथरून त्यावर डाळीच मिश्रण हाताने गोल जाडसर थापून पसरवाव. आता त्याच्या वरच्या बाजूला सेम तसाच चटणीचा थर पसरवा. वडीच्या एका बाजूने कापड उचलून वडी बनवावी. कुकरमध्ये अथवा चाळणीत नेहमी जशा वडी वाफवून घेतो त्याप्रमाणे १०-१५ मिनिट वडी वाफवून घेणे . अळूवडी प्रमाणेच पातळ वड्या पाडून तव्यावर वड्या shallow fry कराव्यात .
 6. तयार गरमागरम वड्या टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्याव्या.

Reviews for Chana Daal Vadi Recipe in Marathi (0)