कोथिंबीर रोल | KOTHIMBIR roll Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  25th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • KOTHIMBIR roll recipe in Marathi,कोथिंबीर रोल, Chayya Bari
कोथिंबीर रोलby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

1

कोथिंबीर रोल recipe

कोथिंबीर रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KOTHIMBIR roll Recipe in Marathi )

 • कोथिंबीर बारीक कापून १वाटी
 • बेसन १/२वाटी
 • तांदुळाचे पीठ १/२वाटी
 • हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट २चमचे
 • हळद १चमचा
 • गरम मसाला १चमचा
 • जिरे १चमचा
 • मोहरी १चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तीळ १चमचा
 • कांदा १
 • पारी साठी
 • मैदा २वाट्या
 • रवा २चमचे
 • मीठ चिमुटभर
 • तेल २चमचे मोहन
 • तेल तळण्यासाठी

कोथिंबीर रोल | How to make KOTHIMBIR roll Recipe in Marathi

 1. प्रथम कोथिंबीर बेसन,तांदुळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ,हिरवी मिरची आले लसूण पेस्ट,मीठ ,हळद टाकून मिक्स करावे
 2. गरजेनुसार पाणी टाकून घट्ट रोल करावा चाळणी वर ठेवून वाफवून घ्यावा
 3. तोपर्यंत मैदा,मीठ ,रवा व गरम तेलाचे मोहन टाकून मिक्स करावा व पाणी थोडे थोडे घालून घट्ट भिजवावा व झाकून ठेवावे
 4. आता तेल तापवून जिरे मोहरी घालावे कांडा चिरून घालावे मग थोडी हळद ,तिखट व गरम मसाला मिक्स करावा आता वाफवलेला रोल कुस्करून त्यात घालून परतावे व वाफ घ्यावी stuffingतयार
 5. आता मैद्याची पोळी लाटून त्याचे आयात कापून त्यात stuffing भरावे
 6. याप्रमाणे सर्व रोल भरावे
 7. कढईत तेल तापवून दोन्ही बाजूनी खमंग तळावेत
 8. सॉस बरोबर किंवा नुस्त्याही छान लागतात

My Tip:

कोथिंबीर ऐवजी चिवळ ची भाजी वापरून रोल करता येतात

Reviews for KOTHIMBIR roll Recipe in Marathi (1)

Maya Ghuse5 months ago

Tasty and healthy!
Reply