गोड शंख | Sweet shankh Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  29th Jun 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Sweet shankh by Smita Koshti at BetterButter
गोड शंखby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

1

गोड शंख recipe

गोड शंख बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet shankh Recipe in Marathi )

 • 1 वाटी मैदा
 • चिमूटभर मीठ
 • तूप तळण्यासाठी
 • दूध किंवा पाणी
 • 1/2 वाटी साखर

गोड शंख | How to make Sweet shankh Recipe in Marathi

 1. मैदा गाळून त्यात 2 चमचे तूप, मीठ, व दूध किंवा पाणी घालून चांगले घट्ट मळून घ्या व 10 मिनिटे ओल्या स्वच्छ सूती कपड्याने झाकून ठेवा.कपडा घट्ट पिळलेला हवा
 2. नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे सगळे छोटे गोळे तयार करून घ्या
 3. ही एक लाकडी फळी आहे हिला शंखपट्टी असेही म्हणतात.
 4. मैद्याची छोटी गोळी घेऊन दाब देऊन शंख बनवून घ्या.
 5. व फोटो मधे दाखवल्या प्रमाणे शंख बनवून घ्या .
 6. सगळे शंख बनवून झाल्यानंतर तूप गरम करून मंद आंचेवर शंख तळून घ्या
 7. सगळे शंख तळून झाल्यावर पाक करायला घ्या .साखर व अर्धी वाटी पाणी घालून चांगला गोळीबंद पाक करून घेणे
 8. व गरम गरम पाक शंखावर एका चमच्याने ओतत जाणे व दुसर्‍या चमच्याने शंख हलवत रहावे जेणेकरून पाक सगळीकडे व्यवस्थित लागेल
 9. आपले शंख तयार.. हवाबंद डब्यात भरून ठेवणे व हवे तेव्हा खायला घ्या

My Tip:

विकतच्या मैद्यापेक्षा(थोडे वेळखाऊ आहे पण)घरी गव्हाचा रवा मैदा पाडून बनवणे. चव अप्रतिम व पौष्टिक.

Reviews for Sweet shankh Recipe in Marathi (1)

vrushali patharea year ago

Reply