कोन चाट | Sprout cone chat Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sprout cone chat recipe in Marathi,कोन चाट, Manasvi Pawar
कोन चाटby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

कोन चाट recipe

कोन चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sprout cone chat Recipe in Marathi )

 • कोन साठी साहित्य:
 • एक वाटी मैदा
 • १/२ वाटी कणीक
 • एक चमचा ओवा
 • मीठ चवीनुसार
 • थोडं तेलाचं मोहन
 • १/२ वाटी तेल तळण्यासाठी
 • सुरी कापण्यासाठी
 • चार आईस्क्रीम कोन
 • चाट साहित्य:
 • एक वाटी मोड आलेले मूग
 • एक छोटा कांदा चिरून
 • एक टोमॅटो चिरून
 • छोटी वाटी कोथिंबीर
 • पाव चमचा जिरे
 • हिंग
 • थोडी हळद
 • चाट मसाला
 • मीठ चवीनुसार
 • बारीक शेव
 • थोडं तेल
 • एक चमचा लिंबाचा रस

कोन चाट | How to make Sprout cone chat Recipe in Marathi

 1. आधी आपण मैदा कणीक ओवा मीठ व मोहन घालून पीठ भिजवून घ्यावे
 2. मग ते पीठ थोडावेळ बाजूला ठेवून द्यावे
 3. आता गॅसवर एक भांड ठेऊन त्यात जीरे हिंग हळद घालून मूगाला फोडणी द्यावी आणि मीठ घालून मूग शिजवून घ्यावेत
 4. आता आपण मळलेल्या पिठाचे गोळे करुयात
 5. या एका गोळयाची जाडसर चपाती लाटून घ्या
 6. आणि सुरीने असे काप दया
 7. आता एक आईस्क्रीम चार कोन घेऊन हे काप त्यावर लावा व हलक्या हाताने दाबा
 8. असेच सगळे कोन तयार करा
 9. हे गरम तेलात तळून घ्या आणि थोडावेळ थंड होऊ द्या
 10. एका प्लेटमध्ये शिजवलेले मूग कांदा कोथिंबीर मीठ चाट मसाला थोडा टोमॅटो घालून लिंबू रस घालून मिक्स करावे
 11. आता आपले कोन थंड झाले असतील अगदी हळू त्यातील आईस्क्रीम कोन बाहेर काढून घ्यावेत
 12. आता या कोन मध्ये आपण तयार केले ले चाट भरावे वरुन थोडी कोथिंबीर आणि बारीक शेव ने सजवावे
 13. आता खाण्यास द्यावे

Reviews for Sprout cone chat Recipe in Marathi (0)