BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कोन चाट

Photo of Sprout cone chat by Manasvi Pawar at BetterButter
0
6
0(0)
0

कोन चाट

Jun-30-2018
Manasvi Pawar
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोन चाट कृती बद्दल

चाट तर आपण नेहमीच करतो पण मी इथे आईस्क्रीम चा कोन करून त्यात चाट सजवल आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स बर्थडे
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

 1. कोन साठी साहित्य:
 2. एक वाटी मैदा
 3. १/२ वाटी कणीक
 4. एक चमचा ओवा
 5. मीठ चवीनुसार
 6. थोडं तेलाचं मोहन
 7. १/२ वाटी तेल तळण्यासाठी
 8. सुरी कापण्यासाठी
 9. चार आईस्क्रीम कोन
 10. चाट साहित्य:
 11. एक वाटी मोड आलेले मूग
 12. एक छोटा कांदा चिरून
 13. एक टोमॅटो चिरून
 14. छोटी वाटी कोथिंबीर
 15. पाव चमचा जिरे
 16. हिंग
 17. थोडी हळद
 18. चाट मसाला
 19. मीठ चवीनुसार
 20. बारीक शेव
 21. थोडं तेल
 22. एक चमचा लिंबाचा रस

सूचना

 1. आधी आपण मैदा कणीक ओवा मीठ व मोहन घालून पीठ भिजवून घ्यावे
 2. मग ते पीठ थोडावेळ बाजूला ठेवून द्यावे
 3. आता गॅसवर एक भांड ठेऊन त्यात जीरे हिंग हळद घालून मूगाला फोडणी द्यावी आणि मीठ घालून मूग शिजवून घ्यावेत
 4. आता आपण मळलेल्या पिठाचे गोळे करुयात
 5. या एका गोळयाची जाडसर चपाती लाटून घ्या
 6. आणि सुरीने असे काप दया
 7. आता एक आईस्क्रीम चार कोन घेऊन हे काप त्यावर लावा व हलक्या हाताने दाबा
 8. असेच सगळे कोन तयार करा
 9. हे गरम तेलात तळून घ्या आणि थोडावेळ थंड होऊ द्या
 10. एका प्लेटमध्ये शिजवलेले मूग कांदा कोथिंबीर मीठ चाट मसाला थोडा टोमॅटो घालून लिंबू रस घालून मिक्स करावे
 11. आता आपले कोन थंड झाले असतील अगदी हळू त्यातील आईस्क्रीम कोन बाहेर काढून घ्यावेत
 12. आता या कोन मध्ये आपण तयार केले ले चाट भरावे वरुन थोडी कोथिंबीर आणि बारीक शेव ने सजवावे
 13. आता खाण्यास द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर