आळू वडी | Alu vadi Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Alu vadi by Bharti Kharote at BetterButter
आळू वडीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

1

0

आळू वडी recipe

आळू वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu vadi Recipe in Marathi )

 • पाणी आवश्यकतेनुसार
 • तेल तळण्यासाठी
 • चवीनुसार मीठ
 • खोबरे खीस दोन चमचे
 • प्रत्येकी पाव चमचा हळद ओवा हिंग जीरे पूड धने पुड
 • दोन चमचे लाल तिखट
 • दोन चमचे गुळ
 • दोन चमचे चिंचेचा कोळ
 • 4 वाट्या बेसन पीठ
 • 10 आळूची पानं

आळू वडी | How to make Alu vadi Recipe in Marathi

 1. आळूचे पान स्वच्छ धूऊन पूसून घ्या.
 2. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या त्यात सर्व जिन्नस मिक्स करून पीठ भिजवून घ्या. .
 3. एका ताटावर आळूचं पान ठेवून पानाला सगळ्या बाजूंनी पीठ लावा..
 4. असेच एका वर एक पान ठेवून पीठ लावा. .
 5. दोन्ही बाजूंनी घडी घालून त्या वर पीठ लावा
 6. आता वरून खाली अशी गुंडाळी करा..
 7. पांच पानांची एक अशा दोन वड्या बनवा. .
 8. नंतर कुकर मध्ये 15 मी.वाफवून घ्या. .
 9. गार झाल्या वर चाकू ने वड्या कापून घ्या
 10. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 11. मोठ्या आचेवर खमंग वड्या तळून घ्या. .त्यावर खोबरे खीस घालुन सर्व करा. .

My Tip:

मोठ्या आचे वर तळल्याने वड्या कुरकुरीत होतात. .याला पाञा देखिल म्हणतात. .

Reviews for Alu vadi Recipe in Marathi (0)