दाल बाटी | Dal bati Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dal bati recipe in Marathi,दाल बाटी, Rohini Rathi
दाल बाटीby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

दाल बाटी recipe

दाल बाटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal bati Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ दोन कप
 • मक्याचे पीठ अर्धा कप
 • हळदी चिमटीभर
 • मीठ चवीनुसार
 • ओवा एक टिस्पून
 • अख्खे धणे एक टिस्पून
 • बडीशोप अर्धा टी स्पून
 • तेल 3 टेबलस्पून मोहनासाठी
 • कोमट पाणी एक कप
 • डाळ बनवण्यासाठी
 • तुअर दाल एक कप
 • हळदी अर्धा टी स्पून
 • लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
 • तेल एक टेबल school
 • मीठ चवीनुसार
 • कांद्याची प्युरी अर्धा कप
 • टोमॅटोची प्युरी अर्धा कप

दाल बाटी | How to make Dal bati Recipe in Marathi

 1. बाटी बनवण्यासाठी गव्हाची गव्हाचे पीठ मक्याचे पीठ व इतर सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
 2. कोमट पाण्याच्या साह्याने घट्ट कणिक मळून घ्यावे
 3. तयार पिठाचे लिंबूच्या आकारा एवढे गोळे बनवून घ्यावे
 4. आप्पे पॅन गरम करून घ्यावे
 5. तेलाने सर्व ग्रीस करून घ्यावे
 6. तयार बाटी आप्पे पॅनमध्ये मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावी
 7. दोन्ही बाजूने भाजल्यानंतर बाटी तुपामध्ये बुडवून ठेवावे
 8. डाळ बनवण्यासाठी एकच वेळ डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावी
 9. कढईत तेल गरम जिरे मोहरी हिंग फोडणी घालून घ्यावी
 10. कांद्याची टोमॅटोची प्युरी परतून घ्यावी
 11. लाल मिरची पावडर हळद घालून मिश्रण उकळून घ्यावे
 12. चवीनुसार मीठ घालावे
 13. तयार बाटी व दाल लोणच्याबरोबर सर्व करावे

My Tip:

बाटीभाजण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे लागतात

Reviews for Dal bati Recipe in Marathi (0)