बाजरीच्या पीठाची दुरडी | Milet flour duradi Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  7th Jul 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Milet flour duradi recipe in Marathi,बाजरीच्या पीठाची दुरडी, deepali oak
बाजरीच्या पीठाची दुरडीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

2

बाजरीच्या पीठाची दुरडी recipe

बाजरीच्या पीठाची दुरडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Milet flour duradi Recipe in Marathi )

 • बाजरीचे पीठ १ वाटी
 • भोपळा पाव किलो
 • साखर एक वाटी
 • खवा किंवा घट्टसाय एक वाटी
 • तुप एक लहान चमचा
 • तेल एक लहान चमचा
 • मीठ
 • तळणीसाठी तेल
 • पाणी दोन वाटी
 • ड्रायफ्रूट
 • सुके किंवा ओले खोबरे किसुन १वाटी
 • केशरवेलची सीरप किंवा वेलची पावडर १ चमचा

बाजरीच्या पीठाची दुरडी | How to make Milet flour duradi Recipe in Marathi

 1. लाल भोपळ्याच्या बारीक फोडी करून घ्या
 2. साजूक तुपावर ह्या फोडी परतुन घ्या
 3. आता ह्यात साखर घालून मीश्रण कोरडे करून घ्या
 4. आता ह्यात खोबरे व केशर वेलची सीरप घाला
 5. मीश्रण घट्ट होत आले कि खवा व ड्रायफ्रूट घालून हे सारण गार होऊ द‍या
 6. कढईत दोन वाटी पाणी तापत ठेवा
 7. त्या पाण्यात मीठ व चमचाभर तेल घाला
 8. पाणी ऊकळले की बाजरीचे पीठ पसरवून छान ऊकड करून घ्या
 9. आता जरावेळ झाकण ठेऊन वाफेवर पीठ ऊकडुन घ्या
 10. ऊकड परातीत घेऊन तेल पाण्याच्या हाताने छान मळुन घ्या
 11. आता एक छोटा गोळा घेऊन मोदकाला पारी बनवतो तशी लहान जाड पारी बनवा व खालून चीत्रात दाखवले तसे करून घ्या
 12. आता ह्या दुरड्या तेलात मंद आचेवर तळुन घ्या
 13. तळत असताना दुरडीच्या वाटीत पण तेल ऊडवत रहा
 14. आता तळलेली दुरडी चा वाटी सारखा भाग तळल्यामुळे फुलतो तो अंगठ्याने दाबा
 15. आता त्या वाटीत सारण दाबुन भरा
 16. वरून खोबरे घालून सर्व करा
 17. खाताना वरून साजूक तुप आवडत असल्यास घाला.

My Tip:

लालभोपळ्या ऐवजी तुम्ही गाजर हलवा किंवा दुधी हलवा सुध्दा ह्या दुरडीत भरू शकता.

Reviews for Milet flour duradi Recipe in Marathi (2)

samina shaikh4 months ago

छान आहे ग
Reply

Nayana Palav4 months ago

Wow
Reply