खेड्या गावचे पौष्टिक स्प्रिंग रोल | Indian village spring roll Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  7th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Indian village spring roll recipe in Marathi,खेड्या गावचे पौष्टिक स्प्रिंग रोल, priya Asawa
खेड्या गावचे पौष्टिक स्प्रिंग रोलby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

खेड्या गावचे पौष्टिक स्प्रिंग रोल recipe

खेड्या गावचे पौष्टिक स्प्रिंग रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Indian village spring roll Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ 1 वाटी
 • 1/2 तास भिजवून घेतलेली चन्या ची दाळ
 • लसूणपेस्ट 1 चमचा
 • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 • कढीपत्तयाचे 8/10 पान
 • गोडतेल 2 मोठे चमचे
 • मोहरी, जीरे, हिंग फोडणी साठी
 • लाल तिखट 1 चमचा
 • हळद 1/2 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 2 चमचे

खेड्या गावचे पौष्टिक स्प्रिंग रोल | How to make Indian village spring roll Recipe in Marathi

 1. प्रथम गव्हाचे पिठात मीठ घालून मळून घ्या
 2. भिजवलेली चन्याची दाळ हिरवी मिरची ची पेस्ट, लसूण पेस्ट,जीरे व मीठ घालून मिक्सर मधुन एकजीव बारीक काढून घ्या
 3. मळून घेतलेल्या पिठाची पतली पोळी लाटून घ्या
 4. लाटलेल्या पोळी वर चण्याच्या दाळीचे तयार केलेले मिश्रण व्यवस्थित पसरुन घ्या
 5. मिश्रण पसरुन घेतल्यावर पोळी ची 4 बाजु पॅक करून घ्या पोळीचा चोकनी आकार तयार होईल आता त्याचा व्यवस्थित रोल तयार करुन घ्या
 6. अशा प्रकारे सगळे रोल तयार करुन घ्या
 7. एका कडाईत पाणी गरम करायला ठेवा
 8. एका चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्या
 9. तयार केलेले रोल चाळणीत ठेवा
 10. कडाईत चाळणी ठेवा व कडाईवर झाकण ठेवून 15 / 20 मी. रोल वाफवून घ्या
 11. रोल चांगले गार होउन द्या
 12. गार झालेल्या रोल चे सुरीने छोटे छोटे रोल कापून घ्या
 13. एका कडाईत तेल फोडणी साठी ठेवा
 14. तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे, हिंग घालून फोडणी द्या कढीपत्ता घालून चांगले तळून घ्या लाल तिखट, हळद व कापलेले रोल व चवीनुसार मीठ घालून चांगले परतुन घ्या
 15. किसलेला खोबरा वरुन कोथिंबीर घालून थोडे आजुन परतुन घ्या
 16. तयार झालेले स्प्रिंग रोल एका प्लेट मध्ये घेउन कोथिंबीर ने सजवून गरमागरम सर्व करा

My Tip:

पोळी लाटताना एकदम पतलीच लाटावी

Reviews for Indian village spring roll Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo