गवसणीच्या पोळ्या | GAVASANICHI poli Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • GAVASANICHI poli recipe in Marathi,गवसणीच्या पोळ्या, Minal Sardeshpande
गवसणीच्या पोळ्याby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

9

0

गवसणीच्या पोळ्या recipe

गवसणीच्या पोळ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make GAVASANICHI poli Recipe in Marathi )

 • एक वाटी तांदूळ पिठी
 • एक वाटी पाणी
 • मीठ
 • अर्धा चमचा लोणी
 • तीन वाट्या कणिक
 • मीठ कणकेत घालायला
 • दोन चमचे तेल
 • पाणी कणिक भिजवण्यासाठी
 • थोडी सुकी कणिक

गवसणीच्या पोळ्या | How to make GAVASANICHI poli Recipe in Marathi

 1. एक परातीत कणिक चवीनुसार मीठ आणि तेल घालून नेहमीच्या पोळीला लागते तशी भिजवा.
 2. झाकून ठेवा.
 3. एक कढईत पाणी उकळत ठेवा.
 4. त्यात चवीनुसार मीठ आणि लोणी घाला.
 5. उकळी आली की गॅस मंद करा.
 6. तांदूळ पिठी घाला, ढवळा आणि पाच मिनिटं वाफ काढा.
 7. उकड गार होऊ द्या.
 8. गार झाल्यावर नीट मळा.
 9. लिंबाएवढा उकडीचा गोळा घ्या.
 10. कणकेची वाटी करून त्यात पूरण पोळी प्रमाणे उकडीची गोळी भरून नेहमीच्या पोळीप्रमाणे सुक्या कणकेवर लाटा.
 11. असं भरा
 12. आता लाटलेली पोळी तव तापवून नेहमीप्रमाणे भाजा.
 13. तयार पोळी अतिशय लुसलुशीत होते.
 14. शेवयांच्या खिरी सोबत किंवा आमरसा सोबत अप्रतिम लागते.

My Tip:

मोदकाची उकड उरली तरी तुम्ही ही पोळी करू शकता.

Reviews for GAVASANICHI poli Recipe in Marathi (0)