मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाच्या ताम चे ढोकळे

Photo of Shewayi tam Dhokla by priya Asawa at BetterButter
48
2
0.0(0)
0

शेवयाच्या ताम चे ढोकळे

Jul-09-2018
priya Asawa
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाच्या ताम चे ढोकळे कृती बद्दल

हेल्दी डाइट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. ढोकळयासाठी
  2. शेवायाची ताम 1 वाटी
  3. गव्हाचे पीठ 1 वाटी
  4. आर्धी वाटी भिजवलेली चन्याची दाळ
  5. लाल तिखट 1 चमचा
  6. हळद पाव चमचा
  7. चवीनुसार मीठ
  8. वरण साठी
  9. 1 वाटी शिजवून घेतलेली तुरीची दाळ
  10. फोडणी साठी चांगले तुप 1 चमचा
  11. मोहरी, जीरे, हिंग फोडणी साठी
  12. हळद 1/2 चमचा
  13. चिरलेली हिरवी मिरची 1/2 चमचा
  14. कढीपत्तयाचे 5/7 पान
  15. बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा
  16. चवीनुसार मीठ
  17. लिंबू च्या फोढ 5/6
  18. चांगले तुप वरुन घेण्यासाठी

सूचना

  1. ढोकळया चे लागणारी सगळी सामग्री मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मध्यम घट्ट पिठ मळून घ्या
  2. पिठाचे छोटे छोटे बाॅल करा व हाताला तेल लावून हाताने थापून बाॅल चे मध्यम जाड ढोकळे तयार करा
  3. एका कुकरमध्ये खाली पाणी घालून पाॅटला तेल लावून ढोकळे पाॅट मध्ये ठेवा पाॅट वर झाकण ठेवून कुकर चे झाकण लावा कुकर गॅसवर ठेवून कूकरच्या 4 ते 5 शिट्या घ्या
  4. वरण साठी
  5. एका कडाईत फोडणी साठी चांगले तुप घाला तुप गरम झाले की त्यात मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद घालून वरणाला खमंग फोडणी द्या चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन उकळून घ्या
  6. सर्व करताना एका प्लेट मध्ये वरण व ढोकळे त्याच्यावर थोडे जास्त साजूक तूप व कोथिंबीर घालून लिंबु बरोबर गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर