नाचणी खजूर केक | RAGI DATES CAKE Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • RAGI DATES CAKE recipe in Marathi,नाचणी खजूर केक, आदिती भावे
नाचणी खजूर केकby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

नाचणी खजूर केक recipe

नाचणी खजूर केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make RAGI DATES CAKE Recipe in Marathi )

 • नाचणी पीठ दिड वाटी
 • खजूर 1 वाटी (बिया काढलेला)
 • पिठी साखर 1 वाटी
 • कॉर्न फ्लोअर 2 चमचे
 • लोणी 1 वाटी
 • दूध 1 वाटी
 • दही 2 चमचे
 • बेकिंग पावडर 1 चमचा
 • खायचा सोडा 1 चमचा
 • Dry fruits आवडीनुसार

नाचणी खजूर केक | How to make RAGI DATES CAKE Recipe in Marathi

 1. दुधात खजूर अर्धा तास भिजवून ठेवावा. त्यात मग पीठी साखर घालून मिक्स करावे दही घालावे, लोणी घालावे . चांगले फेटावे .
 2. नाचणी पीठ, कॉर्न फ्लोअर , सोडा, baking पावडर घालावी सगळे बिटर ने नीट फेटून घ्यावे.
 3. मोठे पातेले झाकण ठेवून गरम करत ठेवावे . त्यात मग जाळी किंवा स्टँड ठेवावे . आता तुपाचा हात लावून केक चे भांडे तयार करावे,
 4. मग त्यात केक चे मिश्रण घालावे ड्राय fruits घालावेत . हे केकचे भांडे गरम करत ठेवलेल्या पातेल्यात ठेवावे. वरून ताट ठेवून पातेले झाकावे .
 5. पहिल्यांदा 5 मिनिटे मोठ्या flame वर गॅस ठेवून नंतर 20 ते 25 मिनिटे medium flame वर ठेवावा . टूथपिक घालून पाहावे, टूथपिक clear आली की केक झाला असे समजावे . Healthy नाचणी खजूर केक तयार

My Tip:

खजूर गोड असतो त्यामुळे साखर कमी लागते, आपल्या choice ने ती घालू शकता अक्रोड यात छान लागतात, डब्बात मुलांसाठी छान पदार्थ

Reviews for RAGI DATES CAKE Recipe in Marathi (0)