Home / Recipes / Nachni/Ragi Cake

Photo of Nachni/Ragi Cake by Swati Kolhe at BetterButter
1812
7
0.0(0)
0

Nachni/Ragi Cake

Mar-09-2018
Swati Kolhe
30 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Nachni/Ragi Cake RECIPE

नाचणी: नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. नाचणी हे अनेक फायदे होतात… कैल्शीयम – हे मोठ्या मात्रेत असल्याने अर्थातच हाडे मजबूत होतात . आयर्न – रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमान सूधारते व अनिमिया होत नाही. फॉसफोरस व पोटँशियम -ही शरीरातील लिक्विड बँलन्स सांभालतात. नाचणीतील अँटी ऑक्सिडंट ने वार्धक्य दूर रहाते. त्यातील पॉलीफ़ेनोल्स नी रक्तातील शर्करेची मात्रा व्यवस्थित रहाते. ट्राइग्लिसरायड कमी करते तसेच LDL कलेस्टरॉल कमी करते. आता हे सर्व फायदे पहाता नाचणी ची पौष्टीकता तुमच्या लक्षात आली असेलच . रोजच्या आहारात पेज, भाकरी, नाचणीचे थालीपिठ अशा अनेक प्रकारे नाचणी सेवन करता येईल. अगदी तान्ह्या बालापासून वयोवृद्ध अशा सर्वांसाठी आहारात नाचणीचा नियमीत वापर अत्यंत गरजेचा आहे. खजूर: खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो. गूळ: १) पिंपल्सची समस्या सामान्य आहे. खाण्यात जास्त तेल-मसाल्यांचा उपयोगामुळे किंवा धुळीमुळे पिंपल्स येतात. जर रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर ही समस्या दूर होऊ शकते. २) गुळामध्ये आयर्नचा समावेश असतो. त्यामुळे सकाळी-सकाळी पाण्यासोबत याचं सेवन केल्यास एनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो. ३) जर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल, तेव्हाही गुळ खाणे अधिक फायदेशीर असू शकतं. थकवा जाणवल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल. ४) गुळ गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर करतो. जेवण केल्यानंतर थोडा गुळ खावा त्याने पचनही चांगलं होतं आणि गॅसची समस्याही दूर होते. ५) दम्याचा त्रास होत असला तरी गुळामुळे फायदा होतो. गुळामध्ये अ‍ॅंटी अ‍ॅलर्जिक तत्व असतात जे दम्याला आराम देतात. यामुळे शरिरातील तापमानही नियंत्रीत राहतं. ६) श्वासासंबंधी काही त्रास असेल तर त्यावरही गुळ फायदेशीर होऊ शकतो. पाच ग्रॅम गुळ तितक्याच सरसो तेलात मिसळून खावे, त्याने श्वासाशी निगडीत समस्या दूर होईल. ७) घसा बसलावरही गुळाने आराम मिळतो. घसा बसल्यास शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे. ८) इतकेच काय तर कान दुखत असेल तर त्यावरही उपाय म्हणून गुळ वापरता येतो. गुळाला तुपासोबत मिसळून खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल.

Recipe Tags

  • Egg-free
  • Medium
  • Baking
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. नाचणी पीठ १ कप
  2. रवा १/४ कप
  3. सुकामेवा(काजू,बदाम,मनुका) १/८ कप
  4. दही १/२ कप
  5. बिया काढलेले खजूर ३/४ कप
  6. कोमट दूध ३/४ कप
  7. गायीचे तूप किंवा लोणी १/४ कप
  8. बेकिंग पावडर ३/४ tsp
  9. बेकिंग सोडा १/२ tsp
  10. व्हॅनिला इसेन्स १ tsp
  11. मीठ चिमूटभर
  12. गुळ २-३ tbsp(गरज लागलीच तर)
  13. बेकिंगसाठी:
  14. कुकर/कढई किंवा पॅन
  15. केकचे भांडे
  16. मीठ / समुद्राची वाळु

Instructions

  1. गरम दुधात खजूर २०-२५ मिनिटं भिजत घालावे.
  2. २०-२५ मिनिटानंतर खजूर दुधाची पेस्ट करून घ्यावी.
  3. मोठ्या पसरत बाउल मध्ये तूप व दही चांगले फेसाळ होईपर्यंत फेटून घ्यावे.
  4. मग दह्यात खजूर पेस्ट, व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे.
  5. कुकरच्या तळाला मीठ किंवा समुद्राची वाळू पसरवून त्यावर स्टँड ठेवून १० मिनिट झाकण ठेवून मोठ्या गॅसवर मीठ व कुकर गरम होऊ द्यावा.
  6. वरील दही, खजुराच्या मिश्रणात नाचणी पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व रवा, मीठ चाळून घालावे व छान हलक्या हाताने एकजीव करून घ्यावे.
  7. बॅटर घट्ट वाटल्यास थोडे पाणी किंवा दूध घालावे.
  8. शेवटी सुकामेवा घालून अलगद मिक्स करावे.
  9. केक च्या भांड्याला थोडे तूप लावून घ्यावे व केकचे मिश्रण ओतावे. २-३ वेळा किचन ओट्यावर हलके आपटावे, जेणेकरून त्यातील बुडबुडे निघून जातील(टीप१)
  10. कुकर मधल्या स्टँड वर केकचे भांडे ठेऊन कुकर बंद करून घ्यावा. २०-२५ मिनिट मध्यम अचेवर केक बेक करावा..
  11. साधारण १५-२० मिनिटानंतर कुकर उघडून केक मध्ये सूरी घालून बघावी जर सूरी स्वछ आली तर केक झाला म्हणून समजावे, नाहीतर आणखी ५-७ मिनिट बेक करावा.
  12. टीप १- केक मधले बुडबुडे टॅप करून काढून टाकायचे असतात, नाही काढले तर केक बेक झाल्यावर आत जाऊन केकच्या वर खड्डा पडतो.
  13. टीप २- केक चे बॅटर बनवल्यावर त्याकजी चव चाखून पहावी कमी गोड वाटल्यास गुळ घालावा.
  14. टीप ३- कूकर कढई आणि कुकर चे भांडे कती जाड बारीक आहे त्यावरून केक बेक करण्याचा वेळ सहसा ठरवलं जातो म्हणूनच २० मिनिट नंतर केक चेक करून घ्यावा.
  15. टीप ४- ३/४ नाचणी पीठ व १/४ कप कणिक असे प्रमाण घेतले तरी चालते.
  16. टीप ५ केकक्सच्या भांड्याला तूप लावून त्यावर बटर पेपर किंवा थोडासा मैदा पसरून घ्यावा जेणेकरून केक खाली चिकटणार नाही.
  17. टीप ६ आकर्षक दिसावे म्हणून वरून चॉकोलेट सिरप ने सजवू शकता.
  18. बहिणीच्या मुलांसाठी नेट वर पाहून बनवून पाहिले, खूप छान झाला केक अगदी काही मिनिटांमध्येच फस्त झाला की हो... :blush:

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE