पंचपिठा ची रंगीत लिट्टी/बाटी | Five flour coloured Litti /Bati Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  11th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Five flour coloured Litti /Bati recipe in Marathi,पंचपिठा ची रंगीत लिट्टी/बाटी, जयश्री भवाळकर
पंचपिठा ची रंगीत लिट्टी/बाटीby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  90

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

1

पंचपिठा ची रंगीत लिट्टी/बाटी recipe

पंचपिठा ची रंगीत लिट्टी/बाटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Five flour coloured Litti /Bati Recipe in Marathi )

 • 1/2 कप बाटी च रवाळ गव्हा च पिठ
 • 1/2 कप ज्वारी चे पिठ
 • 1/2 कप बाजरी पिठ
 • 1/2 कप मक्याचे पिठ
 • 1/4 कप सातू चे पिठ
 • 1/4 चमचा बेकिंग पावडर
 • 1/2 कप घरची दुधा ची साय/क्रीम
 • 1/4 चमचा जिरे
 • 1/4 चमचा हळद
 • 1/4 चमचा लाल तिखट
 • 1/2 चमचा मिठ
 • 2 कप साजूक तूप

पंचपिठा ची रंगीत लिट्टी/बाटी | How to make Five flour coloured Litti /Bati Recipe in Marathi

 1. .सगळं साहित्य एकत्र जवळ ठेवा
 2. सगळे साहित्य जवळ ठेवा.
 3. आता सगळ्या पिठांन मध्ये एक एक चिमूट मिठ,1/2 चमचा साय आणि एक एक चिमूटभर बेकिंग पावडर घाला ,फक्त गव्हाच्या पिठात 1 चमचा साय घाला.
 4. आता एक एक करून प्रत्येक पिठात घातलेले जिन्नस नीट मिक्स करून पाण्यानी थोडी सैल म्हणजे पोळ्यां सारखी कणिक मळून घ्या आणि 10 मिनिट झाकून ठेवा.
 5. आता सातू च्या पिठात 1चमचा तूप,जिरे,तिखट आणि चवीनुसार मिठ लागले तर 1 चमचा पाणी घालून मिक्स कराआणि छोटे छोटे गोळे करून घ्या.
 6. आता आम्हाला बाटी बनवायची आहे. आधी आम्ही प्रत्येक पिठा च्या हातानेच छोट्या पुऱ्या बनवून घेऊ आणि रंग संगती यावी म्हणून  अंदाजे एक  गडद रंग एक फिक्का रंग आपल्या आवडीनुसार ठेवू.
 7. मी आधी गव्हा ची पूरी त्यावर सातू पिठाची गोळी,मग ज्वार,मक्का,आणि बाजरा ची पुरी घेतली आहे.थोडं क्रम चित्रा प्रमाणे बदलू पण शकता .
 8. बाटी बनवायची विधी नंबर 1- एका वर एक पोळ्या आणि वर सातू पीठा ची गोळी ठेवून तुपाचा हात लावून पुरणाच्या पोळी सारख बंद करून घ्यावे.
 9. बाटी बनवायची विधी नंबर 2 - पहले सातू पिठाच्या गोळी  गव्हाची पोळी नी बंद करायची,मग ह्यावर ज्वारी ची पूरी, मग मक्याची मग बाजरी ची पूरी नी आतला गोळा बंद करायचा ,थोडं आतलं पिठ दिसत असले तरी काही हरकत नाही.
 10. आता पुन्हा सगळ्या बाटी न वर तूप लावा.
 11. मायक्रोवेव्ह कनवेकशन मोड वर 200℃ वर प्री हीट करून 180℃ वर लो रॅक वर 15 मिनिट बेक करायला ठेवा.
 12. 15 मिनिटांनी सर्व बाटी पालटून ठेवा प्रत्येकावर थोडं तूप  घाला आणि परत 10 मिनिट 180℃ वर बेक करा.
 13. लिट्टी /बाटी तुपात बुडवून काढा .
 14. आता बाटी चे चाकूने मधून दोन भाग करा आपल्याला पिठांची कमाल दिसेल म्हणजेच रंगीत बाटी दिसेल.
 15. पंच पिठा ची रंगीत बाटी पंच डाळीच्या वरणा सोबत सर्व्ह करा.

My Tip:

पांच पिठाच्या ऐवजी आपल्या आवडी प्रमाणे कमी करू शकता.

Reviews for Five flour coloured Litti /Bati Recipe in Marathi (1)

Mukta Deolalikar4 months ago

खूप छान आईडिया आहे मि एकच आटे ची केली आहे
Reply
जयश्री भवाळकर
4 months ago
खूप धन्यवाद ,ही पण करून बघाल आवडेल तुम्हाला:thumbsup::thumbsup::blush:

Cooked it ? Share your Photo