मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया

Photo of Pearl Millet (Bajra) idiyappam or shevaya by Sujata Hande-Parab at BetterButter
0
6
0(0)
0

बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया

Jul-12-2018
Sujata Hande-Parab
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीच्या पिठाचे इडिअप्पम किंवा शेवया कृती बद्दल

इडियप्प्पम (मलयालम) याला तुळू येथे सेजगे, कन्नडमधील शेवगे इंग्रजीत स्ट्रिंग हॉपर, गोव्यातील शेवयो आणि महाराष्ट्रातील सेवया या नावानेही ओळखले जाते. ते वाफवून कोणत्याही शाकाहारी, नॉन-शाकाहारी किंवा नारळ दूध सोबत सर्व्ह केले जातात. हे प्रामुख्याने तांदळाच्या पीठाने बनविले जाते आणि मसालेदार शाकाहारी किंवा गोड नारळाच्या दुधाबरोबर सर्व्ह केले जाते. या कृती मध्ये मी तांदूळ पीठ ऐवजी बाजरी पिठाचा वापर केला आहे. हा इडिअप्पम चा हेल्थी प्रकार गोड नारळाच्या दूध बरोबर अतिशय स्वादिष्ट लागतो. अतिशय पोषक आणि हेल्थी डिश बाजरीच्या पिठाचा वापर करून बनवलेली आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • साऊथ इंडियन
 • बॉइलिंग
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. इडिअप्पम किंवा शेवया - बाजरीचे पीठ - १ कप
 2. तूप - २ टेबलस्पून 
 3. स्वादानुसार मीठ
 4. पाणी - १ कप 
 5. नारळाच्या दुधासाठी - कोमट नारळ दूध - १ १/२ कप
 6. किसलेला गूळ - ¼ -1/2 कप (आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करा)
 7. जायफळ पावडर - 1/4 टीस्पून
 8. वेलची पूड - 1/2 टिस्पून

सूचना

 1. नारळाच्या दुधासाठी - एका खोल वाडग्यात नारळाचे दूध घ्या. हे थोडेसे कोमट असावे.
 2. किसलेला गूळ घालावा. तो विरघळलेपर्यंत चांगला मिसळा.
 3. जायफळ आणि वेलची पूड घाला. चांगले मिक्स करावे
 4. दुसऱ्या वाडग्यात हे दूध गाळणीने गाळून घ्या. गोड नारळ दूध तयार आहे.
 5. इडिअप्पम किंवा शेवया - एक पॅन मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ आणि तूप घालावे. बाजरीचे पीठ हळूहळू टाकून मिक्स करावे.
 6. कणिक एकत्र येईपर्यंत व्यवस्तिथ मिक्स करावे. कमी ज्योत वर हे करा. कणीक थोडं चिकट असल्यास पिठ घाला आणि चांगले मिक्स करावे. गॅस बंद करून पॅन १५ मिनीट झाकून ठेवा.
 7. हाताला साधे पाणी लावून कणिक नरम मळून घ्या. मध्यम आकाराचे थोडे लंबकार गोळे करून घ्या.
 8. एका इडली पात्रामध्ये पाणी घेऊन ते गरम करण्यास ठेवा. इडली प्लेट्स किंवा साचाना तेल लावून घ्या.
 9. सर्वात छोट्या आकाराची शेव साचा घ्या. त्यात हे बनवलेले गोळे घालून व्यवस्तिथ दाबून घ्या. राहिलेली कणिक एका ओल्या कापडाने झाकून ठेवा.
 10. साचा बंद करून तयार इडली साचा वर इडिअप्पमस गोलाकार रीतीने प्रेस करून किंवा घालून घ्या.
 11. 5 मिनिटांसाठी इडीअप्पम स्टीम किंवा वाफवून घ्या. गॅस बंद करा. 3-4 मिनीटे कुकरमध्ये राहू द्या. इडली प्लेट बाहेर काडून काही सेकंड तसेच राहू द्या.
 12. फोर्क च्या मदतीने कडा थोड्या लूज करून घ्या. इडिअप्पम ताटात हळुवारपणे काडून घ्या.
 13. गोड नारळ दूध किंवा कोणत्याही मसालेदार करीबरोबर गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर