चटपटीत ग्रीन समोसा | Green Coriander Flavour Samosa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green Coriander Flavour Samosa recipe in Marathi,चटपटीत ग्रीन समोसा, Bharti Kharote
चटपटीत ग्रीन समोसाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

3

0

चटपटीत ग्रीन समोसा recipe

चटपटीत ग्रीन समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green Coriander Flavour Samosa Recipe in Marathi )

 • दोन कप मैदा
 • दोन टेबलस्पून तेल
 • एक कप कोथिंबीर पयुरी (आल लसूण हिरवी मिरची चवीनुसार मिक्सर मध्ये वाटून )
 • पाव चमचा जीरे पूड ओवा
 • चवीनुसार मीठ
 • स्टफींग साठी --
 • दोन मध्यम आकाराचे ऊकडलेले बटाटे
 • तेल जीरे आल लसूण पेस्ट फोडणी साठी
 • पाव चमचा हळद हिरवी मिरची एक चिरून
 • कोथिंबीर चिरून
 • अर्धी वाटी खोबरयाचा खीस
 • चवीनुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल

चटपटीत ग्रीन समोसा | How to make Green Coriander Flavour Samosa Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मैदा घेऊन त्यात जीरे पूड ओवा मीठ आणि तेल टाकून हाताने मिक्स करून घ्या. .
 2. ईमेज मध्ये दाखवल्या प्रमाणे पिठाची मूठ वाळली गेली पाहिजे. .
 3. आता त्यात कोथिंबीर ची पयुरी घाला. .
 4. मिक्सर मध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आल लसूण आणी थोडे पाणी घालून पेस्ट बनवायची. .
 5. आता पीठ चांगल मळून एकजीव करा...छान ग्रीन कलर येतो...
 6. 15 मी. बाजूला ठेवा. .
 7. तोपर्यंत स्टफींग करून घ्या. .
 8. ऊकडलेले बटाटे कुस्करून घ्या. .
 9. पॅन मध्ये तेल टाकून जीरे आल लसूण पेस्ट हळद घालून फोडणी करा. .त्यात बटाटे घालून चांगल परतून घ्या. .चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर आणि खोबरयाचा खीस घाला. .
 10. चांगल हलवून स्टफींग तयार करा. ..
 11. कणिक चे छोटे गोळे करून मध्यम आकाराची पोळी लाटून घ्या. .
 12. तीला चाकू ने मधोमध कापून घ्या. .
 13. आता अर्ध गोलाकार पोळी ला कडेने बोटांनी पाणी लावून दोन्ही पदर मधोमध दूमडून शंखूचा आकार दया. ..
 14. त्यात चमचा ने स्टफींग भरा..
 15. त्यात बसेल तेवढेच भरा..
 16. बोटांनी सर्व कडा बंद करा. .
 17. असेच सर्व समोसे बनवून घ्या. .खूप सुंदर कलर आलाय..
 18. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 19. तेल तापल्यावर त्यात समोसे सोडा. .
 20. एका वेळेस तीन समोसे तळू शकता. .
 21. असेच सर्व समोसे तळून घ्या. .आणि टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा. ..गरमागरम. ...

My Tip:

मी ह्यात कव्हर साठी कोथिंबीर पयुरी वापरली आहे. ..आणि आतून बाहेरून खूपच चटपटीत टेस्ट झाली आहे. .तुम्ही पालक बीट टोमॅटो .

Reviews for Green Coriander Flavour Samosa Recipe in Marathi (0)