मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबीचे थालीपीठ

Photo of Cabbage Thalipeeth by Sujata Hande-Parab at BetterButter
1
3
0(0)
0

कोबीचे थालीपीठ

Jul-14-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबीचे थालीपीठ कृती बद्दल

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे थालीपीठ बनवलेले आहे. लोणच्याबरोबर अतिशय चविष्ट लागते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • ब्लेंडींग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. कोबी - ३/४ -१ कप (मिक्सर मधून काढून घेतलेला .फक्त एकदाच लावून घ्यावा. पेस्ट नको.)
 2. ओट्स फ्लोअर - १/२ कप ( ओट्स पावडर करून मिक्स करा)
 3. ज्वारी पीठ - १/२ कप
 4. बाजरी पीठ - १/२ कप
 5. बेसन - १/४ कप
 6. गव्हाचे पीठ - १/२ कप
 7. लिंबाचा रस - १ टेबलस्पून लाल तिखट - १ १/२ टीस्पून
 8. लाल तिखट - १ १/२ टीस्पून
 9. हळद - १/२ टिस्पून
 10. कांदा - १/२ मध्यम बारीक चिरून
 11. चवीनुसार मीठ
 12. तूप / तेल- १/२ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + ३ टेबलस्पून थालीपीठ भाजण्यासाठी आवश्यक
 13. पाणी पीठ मळण्यासाठी 
 14. हिरवी पेस्ट - हिरव्या मिरच्या - ३-४ मध्यम
 15. लसूण पाकळ्या- ५-६
 16. कोथिंबीर पाने - १/२ कप
 17. किसलेले आले - १/२ टेबलस्पून
 18. सर्व्हिंग - लोणचे , चटणी किंवा कोणतेही डीप 

सूचना

 1. लसूण, हिरव्या मिरच्या, किसलेले आले, कोथिंबीर मिक्सर ला जाडसर वाटून घ्या.
 2. कोबी धुवून फूड प्रोसेसरच्या सहाय्याने किंवा मिक्सर वापरुन बारीक करून घ्या. एक पेस्ट बनवू नका.
 3. मोठ्या खोल वाडग्यात गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरी पीठ, ओट्स पीठ, बेसन, मीठ, तयार हिरवी पेस्ट, तेल, लिंबाचा रस, लाल तिखट, हळद, बारीक चिरलेला कांदा घालावा. चांगले मिक्स करावे
 4. जाडसर वाटलेला कोबी घाला. चांगले मिक्स करावे.
 5. थोडे थोडे पाणी घालून मळून घ्या. झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवा
 6. कणिक 10-12 समान भागांमध्ये विभागणे. त्याचे गोळे बनवून घ्या.
 7. मलमल च्या कपड्यावर किंवा प्लास्टिक रॅप ने रोलिंग बोर्ड कव्हर करा.
 8. कणकेचा गोळा घ्या आणि बोटाच्या सहाय्याने सगळ्या बाजूनी सामान दाबून घ्या. ४-५-इंच व्यासाचे पोळी सारखा आकार द्या. आवश्यक असल्यास रोलिंगच्या दरम्यान थोडे तेल वापरा.
 9. बोटाच्या सहाय्याने मध्यभागी एक छिद्र करा. यामुळे थालीपीठ सामान आणि सगळ्या बाजूनी भाजण्यास मदत होते.
 10. नॉनस्टीक तवा किंवा तव्यावर थालीपीठ ठेवा. वर बुडबुडे होईस्तोवर शिजू द्यावे. आच मध्यम ठेवा
 11. परतून घ्या आणि काही सेकंद शिजवा. थोड तूप घालावे
 12. पुन्हा परता आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. दोन्ही बाजूनी हलका ब्राऊन टिपके दिसून येईपर्यंत शिजवा. मध्ये मध्ये थोडे दाबत रहा. जेणेकरून थालीपीठ व्यवस्तिथ भाजले जाईल आणि थोडेसे क्रिस्पी देखील होईल.
 13. ताटात काढुन गरम गरम लोणच्याबरोबर किंवा चटणी सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर