मुख्यपृष्ठ / पाककृती / फुलकोबी मल्टिग्रेन क्रस्ट पिझ्झा

Photo of Cauliflower Multigrain Crust Pizza by Sujata Hande-Parab at BetterButter
0
3
0(0)
0

फुलकोबी मल्टिग्रेन क्रस्ट पिझ्झा

Jul-14-2018
Sujata Hande-Parab
30 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुलकोबी मल्टिग्रेन क्रस्ट पिझ्झा कृती बद्दल

मी हा पिझ्झा कोबीच्या पाकळ्या, नाचणीचे पीठ, ओट्सचे पीठ वापरून केलेला आहे. भाज्यांचा आणि चीजचा वापर टॉपिंग साठी केलेला आहे. यीस्ट शिवाय वापरून केलेला हा पिझ्झा बनवण्यास खूपच सोपा आहे आणि चवीला अतिशय चांगला आहे. बेसला पिझ्झा सौस चा वापर अतिशय कमी प्रमाणातच करावा कारण भाज्यांना हि सौस लावलेला आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • फ्युजन
 • ब्लेंडींग
 • बेकिंग
 • बॉइलिंग
 • स्टीमिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. क्रस्टसाठी किंवा बेस साठी फुलकोबी पाकळ्या - 2 कप
 2. ओट्स पीठ - 3/४ कप
 3. रागी किंवा नाचणी पीठ - १/४ कप 
 4. ओरेगॅनो- 1 टीस्पून
 5. लाल तिखट फ्लेक्स - १/२ टेबलस्पून
 6. लसूण पाकळ्या - 3 
 7. स्वादानुसार मीठ
 8. तेल - कणीक आणि पिझ्झाला लावण्यासाठी - १-२ टेबलस्पून 
 9. पाणी - १-२ कप फुल कोबी वाफवून घेण्यासाठी
 10. टॉपिंगसाठी - बटण मशरूम - १/४ कप (नीट धुवून आणि पातळ कापून घेतलेले)
 11. लाल शिमला मिरची - १ टेबलस्पून पातळ कापलेली 
 12. पिवळी शिमला मिरची - २ टेबलस्पून - पातळ कापलेली 
 13. पिझ्झा सॉस - १ १/२ टेस्पून. बेस साठी + १-२ टिस्पून भाज्यांसाठी
 14. मोझ्झारेला चीज - १/२ कप
 15. प्रोसेसेड चीज - १/२ कप
 16. सजावटीसाठी- पिवळी, लाल शिमला मिरची, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, क्रॅनबेरीज

सूचना

 1. टॉपिंगसाठी - लाल, पिवळी शिमला मिरची, मशरूम चांगले धुवून पातळ काप करून घ्या.
 2. सौस टाकून चांगले व्यवस्तिथ मिक्स करून घ्या. मोझारेला आणि प्रोसिस्ज्ड चीज किसून घ्या.
 3. क्रस्टसाठी - फुलकोबीच्या पाकळ्या पूर्णपणे धुवून घ्या. कढईत पाणी, फ्लोरेट्स आणि मीठ घाला. ७- १०मिनीटे शिजवा.
 4. पाणी पूर्णपणे काढून टाकावे. एकदा थंड झाल्यावर एका वाडगावर मलमिन कापड ठेवून फ्लोरेट्समधून किंवा कोबीच्या पाकळ्यातून शक्य तेवढे पाणी काडून घ्या. एकदम सुके करून घ्या.
 5. शिजवलेल्या आणि पाणी काढुन घेतलेल्या फ्लोरेट्सचे तुकडे, सोलून लसणीच्या पाकळ्या, अर्धे ओट्स पावडर किंवा पूड घाला. मिक्सर मधून काढून घ्या. बारीक झाल्यावर एका वाडग्यात काढून घ्या.
 6. ओरेगनो, लाल तिखट फ्लेक्स, मीठ, उरलेली ओट्स पावडर आणि नाचणी पीठ घालून मिक्स करावे. चांगले मिक्स करावे आणि मळून घ्यावे.
 7. एका प्लास्टिक कव्हर मध्ये गुंडाळून ५ ते १०मिनिटे फ्रीझमध्ये ठेवावे.
 8. 180 डिग्री से वर ओव्हन गरम करावा.
 9. एका पिझ्झा पॅनला तेल लावावे. फ्रीझ मधून काढलेली कणिक पॅन वर घ्यावी. हाताच्या बोटानी सगळ्या बाजूनी समान दाबून गोल आकार(६-७") द्यावा. किंवा कोणताही इच्छित आकार द्यावा. थोडे तेल सगळीकडे लावून १८-२० मिनिटे आधीच गरम केलेल्या ओव्हन मध्ये बेक करावे.
 10. काढून थोडे थंड होऊ द्यावे. नंतर त्यावर थोडासा पिझ्झा सॉस सगळीकडे लावून घ्यावा.
 11. पातळ काप केलेल्या भाज्या व्यवस्तिथ पसरवून घ्याव्यात. मोझ्झारेला चीज, प्रोसेसेड चीज पसरवून घ्यावे.
 12. ७-८ मिनिटे तापलेल्या ओव्हनमध्ये सोनेरी होईपर्यंत बेक करावे.
 13. गार्निश करून गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर