तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल | Tandul pithache pencil roll Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tandul pithache pencil roll recipe in Marathi,तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल, Pranali Deshmukh
तांदूळ पिठाचे पेन्सिल रोलby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल recipe

तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tandul pithache pencil roll Recipe in Marathi )

 • तांदूळ पीठ 1 कप
 • साखर 1/4 कप
 • पाणी 1 कप
 • मीठ चवीपुरतं
 • खाण्याचा हिरवा रंग चिमूटभर
 • डेसिकेटेट कोकोनट 1/4 कप

तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल | How to make Tandul pithache pencil roll Recipe in Marathi

 1. एका कढईत पाणी उकळायला ठेवा त्यामध्ये मीठ साखर घाला
 2. साखर विरघळली कि थोडं थोडं पीठ घालून चमच्याने मिक्स करा .
 3. पीठ मिक्स झाले कि दोन मिनिट झाकण वाफ काढा
 4. आता गरम असतानाच हाताला थोडं तेल लावून हे पीठ मळून घ्या पिठात खाण्याचा रंग डेसिकेटेड नारळ दोन चमचे वेगळं काढून बाकी मिक्स करा .
 5. उंड्याचे हातावर लांब लांब रोल करून कापून घ्या
 6. इडली पात्रात किंवा एका पॅन मध्ये पाणी उकळायला ठेवा वर चाळणी ठेवून हे रोल चाळणीत ठेवा .
 7. वरून झाकण ठेवून 20 मिनिट स्टीम करा .
 8. गरम असतानाच नारळाच्या चुऱ्याने कोटिंग करा .झटपट होणारी हि मिठाई आयत्या वेळेला अगदी धावून येते .

Reviews for Tandul pithache pencil roll Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo