मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स

Photo of Wheat flour sweet noodles by Rohini Rathi at BetterButter
0
6
0(0)
0

गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स

Jul-15-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स कृती बद्दल

तिखट नूडल्स पण दरवेळी खातो पण गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही गोड नूडल्स खाण्यास खूप स्वादिष्ट लागतात लहान मुले आनंदाने खातात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गुळ एक कप
  2. गव्हाचे पीठ एक कप
  3. पाणी अर्धा कप
  4. बडीशोप एक टेबल स्पून
  5. वेलची पूड 1 टिस्पून
  6. गूळ अर्धा कप
  7. बारीक कापलेले काजू-बदाम दो टेबल स्कूल
  8. तांदळाचे पीठ दोन टेबल्स्पून

सूचना

  1. अर्धा कप पाण्यामध्ये एक कप गूळ मिसळून गुळाचे पाणी बनवून घ्यावे
  2. गव्हाच्या पिठामध्ये गुळाचे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
  3. तयार पीठ पासून छोटी-छोटी गोळे बनवून हाताने वळून पातळ लांब नूडल्स बनवून घ्यावे
  4. अशाप्रकारे सर्व पिठाच्या नूडल्स बनवून घ्याव्यात
  5. पॅनमध्ये एक कप पाणी गरम करून त्यामध्ये अर्धा कप गूळ घालून त्याचे सिरप बनवून घ्यावे
  6. तयार न्युडल्स मध्ये एक टेबल स्पून तांदळाचे पीठ शिंपडून नूडल्स मोकळ्या करून घ्यावा त्यामुळे नूडल्स एक दुसऱ्याला चिटकत नाही
  7. तयार नूडल्स सिरपमध्ये घालून मंद आचेवर शिजू द्यावे
  8. गुळाच्या सिरपमध्ये एक टेबल स्कूल बडीशोप घालावी
  9. सिरप घट्ट होण्यासाठी तांदळाचे पीठ मिसळून मंद आचेवर झाकण लावून शिजवून घ्यावे
  10. शेवटी काजू बदामाचे तुकडे घालून बाऊलमध्ये गरम गरम सर्व करावे
  11. अशाप्रकारे गव्हाच्या पिठाच्या नूडल्स तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर