ज्वारी च्या पिठाची ईडली | Jowar flour idli Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jowar flour idli recipe in Marathi,ज्वारी च्या पिठाची ईडली, Manisha Sanjay
ज्वारी च्या पिठाची ईडलीby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  15

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

ज्वारी च्या पिठाची ईडली recipe

ज्वारी च्या पिठाची ईडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jowar flour idli Recipe in Marathi )

 • ज्वारी - ३ वाटी
 • उडीद डाळ - १ वाटी
 • मेथी दाणे - १/२ टीस्पून
 • पोहे - १/४ वाटी
 • मीठ चवी नुसार

ज्वारी च्या पिठाची ईडली | How to make Jowar flour idli Recipe in Marathi

 1. ज्वारी धुवून ४ - ५ तास भिजत घालून ठेवा
 2. उडीद डाळ + मेथी दाणे पीठ बारीक करण्या आधी दोन तास भिजत घालून ठेवा
 3. पोहे पीठ बारीक करते वेळी धुवून भिजत ठेवा.
 4. पीठ बारीक करताना प्रथम डाळ आणि मेथी वाटून घ्या. नंतर भिजवलेले पोहे आणि नंतर ज्वारी बारीक करून घ्या. त्यात पाणी घालून चांगले मिक्स करून इडली साठी लागते तसे पीठ करून घ्या . चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. हे पीठ ८-१० तास आंबवायला ठेवा.
 5. पीठ चांगले आंबले की ईडली पात्रात ईडली १० मिनिटे वाफवून घ्या.

My Tip:

*हे पीठ नेहमी च्या डाळ तांदूळ पीठा पेक्षा लवकर आंबते.

Reviews for Jowar flour idli Recipe in Marathi (0)