मकाई ढोकळा | Corn dhokla Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn dhokla recipe in Marathi,मकाई ढोकळा, Rohini Rathi
मकाई ढोकळाby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

मकाई ढोकळा recipe

मकाई ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn dhokla Recipe in Marathi )

 • उकडलेली मकई अर्धा कप
 • मक्याचे पीठ अर्धा कप
 • रवा अर्धा कप
 • दही अर्धा कप
 • हिरवी मिरचीची पेस्ट एक टिस्पून
 • मीठ चवीनुसार
 • हळदी पावडर अर्धा टीस्पून
 • लिंबूचा रस 1 टिस्पून
 • सोडा 1 teaspoon
 • तेल 1 teaspoon
 • फोडणीसाठी
 • तेल 1 टिस्पून
 • जिरे मोहरी एक टिस्पून
 • हिंग पाव टिस्पून
 • हिरवी मिरचीचे तुकडे 1

मकाई ढोकळा | How to make Corn dhokla Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम हिरवी मिरची उकडलेले मका व दही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
 2. एका बाउल मध्ये रवा मक्याचे पीठ व मक्याचे दळलेले मिश्रण एकत्र करून घ्यावे
 3. चवीनुसार मीठ हळद तेल लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 4. आवश्यकतेनुसार पाणी घालून ढोकळ्या चे मिश्रण बनवावे
 5. सोडा घालून मिश्रण फेटून घ्यावी
 6. तेल लावून तयार केलेल्या ताटाला वरील मिश्रण त्यात घालावे
 7. कढईत पाणी गरम करून ताट ठेवून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे
 8. ढोकळा वाफवल्यास नंतर थंड करून घ्यावा
 9. फोडणीसाठी तेल गरम करून जिरे हिरे मोहरी हिंग व हिरवी मिरची घालून फोडणी बनवून घ्यावी
 10. तयार फोडणी ढोकळ्यावर पसरवून घ्यावी
 11. अशाप्रकारे मकाई चा ढोकळा तयार आहे

My Tip:

ढोकळ्या याचे मिश्रण अर्धा तास भिजवून ठेवले तर ढोकळा अधिक जाळीदार बनतो

Reviews for Corn dhokla Recipe in Marathi (0)