उपमा | Upma Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upma recipe in Marathi,उपमा, Rohini Rathi
उपमाby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

उपमा recipe

उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upma Recipe in Marathi )

 • रवा एक कप
 • तेल एक चमचा
 • मुगाची दाल दोन टेबल स्पून
 • एक बारीक केलेले हिरवी मिरचीचे तुकडे
 • मोहरी अर्धा टी स्पून
 • जिरे अर्धा टी स्पून
 • हिंग पाव टीस्पून
 • शेंगदाणे दोन टेबल स्पून
 • मीठ चवीनुसार
 • बारीक चिरलेला कांदा एक
 • उकळलेले पाणी दोन कप
 • बारीक केलेली कोथिंबीर

उपमा | How to make Upma Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम कढईत तेल गरम करून घ्यावी
 2. गरम तेलात जिरे मोहरी व हिंगाची फोडणी घालून घ्यावी
 3. बारीक चिरलेला कांदा व शेंगदाणे गुलाबी रंग येईल पर्यंत परतून घ्यावे
 4. नंतर मुगाची डाळ घालून लालसर रंग होईपर्यंत परतावी
 5. एक कप रवा घालून रवा लालसर रंग होईपर्यंत परतावा
 6. चवीनुसार मीठ घालावे
 7. उकळलेले पाणी घालून उपमा झाकण ठेवून शिजवावा
 8. कोथंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 9. अशाप्रकारे तयार उपमा थंड करून टिफिन मध्ये भरावा

My Tip:

आवडत असल्यास बारीक चिरलेला टोमॅटो घालावा

Reviews for Upma Recipe in Marathi (0)