पिझ्झा मफिन्स | Pizza Muffins Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  18th Jul 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • Pizza Muffins recipe in Marathi,पिझ्झा मफिन्स, Renu Chandratre
पिझ्झा मफिन्सby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

1

पिझ्झा मफिन्स recipe

पिझ्झा मफिन्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pizza Muffins Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ १ वाटी
 • बारीक चिरून कांदा १/२
 • बारीक चिरून सिमला मिरची १/२
 • बारीक चिरून ऑलिव्ह २
 • मक्याचे दाणे उकडून ४ चमचे
 • टोमॅटो बारीक चिरून १ ( बीया काढून टाका)
 • दूध १/२ - १ वाटी
 • बेकिंग पावडर १ टी स्पून
 • बेकिंग सोडा १/२ टी स्पून
 • मीठ चवीनुसार
 • ऑलिव्ह ऑइल किंवा रोजचे तेल १/२ वाटी
 • काळी मिरी पावडर १/२ चमचा
 • ऑरेंगानो १/२ चमचा
 • मिक्सड हर्ब्स १/२ चमचा
 • ग्रेटेड मोझेरेला चीझ गरजेनुसार

पिझ्झा मफिन्स | How to make Pizza Muffins Recipe in Marathi

 1. एका मिक्सिंग बाउल मध्ये गव्हाचे पीठ, मिक्सड हर्ब्स, ऑरेंगानो, मीठ, ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी पावडर , बेकिंग पावडर आणि मिश्र भाज्या घ्या
 2. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा
 3. दूध घालून , सरसरीत बेटर किंवा पीठ तयार करावे
 4. या वेळी ओव्हन २०० डिग्री वर प्री हीट करायला लावावे
 5. मफ़िन्स मोल्डस ला तेला चा हात लावून त्यात , तयार बेटर घालावे
 6. वरून, ग्रेटेड मोझेरेला चीझ घालावे
 7. ओव्हन मध्ये १८० - २०० डिग्री वर २० - २५ मिनिटे बेक करावे
 8. पिझ्झा मफिन्स तयार आहे
 9. मुलांच्या डब्यात टोमॅटो सौस बरोबर पॅक करावे

My Tip:

मिश्र भाज्या आवडीनुसार घेऊ शकता

Reviews for Pizza Muffins Recipe in Marathi (1)

Deepa Gad4 months ago

ताई तुमच्या रेसिपीची कृती अर्धवट लिहिली गेली आहे ती पूर्ण करा
Reply
Renu Chandratre
4 months ago
Yes updated .. thanks for letting me know :thumbsup::two_hearts::pray: