बटाट्याचे नगेट्स | Potato nagets Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato nagets recipe in Marathi,बटाट्याचे नगेट्स, seema Nadkarni
बटाट्याचे नगेट्सby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    50

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

बटाट्याचे नगेट्स recipe

बटाट्याचे नगेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato nagets Recipe in Marathi )

  • 7-8 उकडलेले बटाटे
  • 1 वाटी मक्याचे दाणे
  • 1 वाटी पनीर
  • 1 /2 वाटी चीज किसलेले
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1/4 टि स्पून हळद
  • चवी पुरते मीठ
  • 1-2 हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर थोडीशी
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1 चमचा काळी मिरी पावडर
  • 1 कप ब्रेड क्रम्स
  • 1/2 चमचा कोनफ्लोर
  • तळण्यासाठी तेल

बटाट्याचे नगेट्स | How to make Potato nagets Recipe in Marathi

  1. सवॅ प्रथम उकडलेले बटाटे सोलून मऊ कुस्करून घ्या.
  2. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद आणि लाल तिखट घालून एकत्र करावे.
  3. आता मक्याचे दाणे शिजवून घ्या. त्यात पनीर किसून घ्या, किसलेले चीज एकत्र करावे. चवीला मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर,मिरपूड घालून एकत्र करावे. (हिरवी मिरची नाही आवडत असेल तर नका घालू)
  4. बटाट्याचे मिश्रणात कोनफ्लोर घालून एकत्र करावे आणि त्याची पारी करून वरील मक्याचे मिश्रण भरून छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  5. ब्रेड क्रम्स लावून घ्या.
  6. त्या गोळ्याना ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून तेलात तळून घ्यावे किंवा फ्रिज मध्ये ठेवावे लागेल तसे गरमागरम तळून घ्यावे.

Reviews for Potato nagets Recipe in Marathi (0)