भरवा करेला | Bharva Karela Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bharva Karela recipe in Marathi,भरवा करेला, Deepa Gad
भरवा करेलाby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

भरवा करेला recipe

भरवा करेला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bharva Karela Recipe in Marathi )

 • कारली पाव किलो
 • कांदा मोठा १
 • टोमॅटो १
 • कांदा खोबऱ्याचे वाटण
 • दाण्याचे कूट २ च
 • मालवणी मसाला २-३ च
 • आलं लसूण पेस्ट १ च
 • मीठ
 • चिंचगुळ कोळ २-३ च
 • तेल
 • कोथिंबीर

भरवा करेला | How to make Bharva Karela Recipe in Marathi

 1. कारल्याचे २-३ तुकडे करून घ्या व ते पाणी आणि मीठ घालून कुकरमध्ये २-३ शिट्या करून घ्या
 2. कढईत तेल घालून त्यात चिरलेला कांदा व टोमॅटो मऊ होईपर्यंत परता
 3. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता
 4. तोपर्यंत शिजवलेली कारली घेऊन त्यातील बिया चमच्याच्या टोकाने काढून टाका
 5. डिशमध्ये कांदा खोबऱ्याचे वाटण घेऊन त्यात दाण्याचे कूट, मालवणी मसाला, मीठ, चिंचगुळ पेस्ट १ च घालून मिक्स करा
 6. हे मिक्स केलेला वाटण कारल्यात भरून घ्या
 7. कढईत सोडा राहिलेलं वाटण व थोडं पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढा
 8. चिंचगुळ पेस्ट राहिलेली घालून परत एकदा चांगली वाफ काढा
 9. शिजली की कोथिंबीर घालून टिफिनसाठी चपातीबरोबर द्या

My Tip:

भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आदल्या दिवशी करून ठेवणे. मी ८ दिवसाचे करून ठेवते त्यामुळे पटकन वापरता येते

Reviews for Bharva Karela Recipe in Marathi (0)