डाळ तांदुळ रोल्स | Dal Chaval Rolls Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dal Chaval Rolls recipe in Marathi,डाळ तांदुळ रोल्स, Vaishali Joshi
डाळ तांदुळ रोल्सby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

डाळ तांदुळ रोल्स recipe

डाळ तांदुळ रोल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Chaval Rolls Recipe in Marathi )

 • चणा डाळ १ कप
 • तांदुळ पीठ १ १/२ कप
 • आल लसूण मिर्ची जीरे पेस्ट ३ चमचे
 • कोथिंबीर
 • आमचूर १ चमचा
 • हळद
 • चिली फ्लेक्स १ चमचा
 • मीठ
 • मोहोरी
 • करीपत्ता
 • हिंग
 • तेल

डाळ तांदुळ रोल्स | How to make Dal Chaval Rolls Recipe in Marathi

 1. चणा डाळ ४ तास भिजवून घ्या आणि बाहेर काढून मिक्सर मधे पाणी न घालता वाटुन घ्या
 2. त्यात आल लसूण मिर्ची जीरे पेस्ट घाला , चिलिफ्लेक्स , हळद , मीठ आमचूर , २ चमचे तेल आणि कोथिंबीर घालून मिक्स करुन ठेवा
 3. त्याचे लांबट गोळे करुन घ्या
 4. तांदुळा चे पीठ मिठ घालून पाण्याने घट्ट सर भिजवून घ्या आणि खुप मळून घ्या
 5. त्या पिठाचे गोळे करून घ्या , एक गोळा घेवुन त्याची जाडसर पारी करा आणि त्यात डाळीचा लांबट गोळा ठेवून बंद करा .
 6. असे सगळे गोळे लांबट आकारात तयार करुन घ्या
 7. गैस वर एका कढईत पाणी टाकून उकळू द्या, ते उकळल्यावर त्यात हे बनवलेले रोल्स टाका आणि झाकून ठेवा
 8. थोड्या वेळात ते वर तरंगतील की गैस बंद करुन झार्याने काढून घ्या आणि थंड होउ द्या
 9. त्याचे १/२ इंच गोल गोल काप करुन घ्या
 10. पैन मधे तेल घाला
 11. मोहोरी , हिंग , करी पत्ता घालून सगळे काप त्यात फ्राय करा ,
 12. बस तयार डाळ तांदुळ रोल्स टिफिन मधून पोटात सोबत एखादी पातळ चटनी द्या

My Tip:

तिखट आणि मीठ थोड जास्ती टाकाव , पाण्यात उकळल्यावर कमी होउन जात .मग अळणी लागू शकत .

Reviews for Dal Chaval Rolls Recipe in Marathi (0)