फोडणी ची भाकरी | Phodnichi bhakri Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Phodnichi bhakri recipe in Marathi,फोडणी ची भाकरी, Susmita Tadwalkar
फोडणी ची भाकरीby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

फोडणी ची भाकरी recipe

फोडणी ची भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Phodnichi bhakri Recipe in Marathi )

 • २-३ उरलेल्या भाकरी
 • २ मध्यम कांदे बारिक चिरलेले
 • २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
 • मुठभर शेंगदाणे
 • फोडणीचं साहित्य
 • २ मोठे चमचे तेल
 • मिठ, तिखट चवीप्रमाणे
 • चिरलेली कोथिम्बीर

फोडणी ची भाकरी | How to make Phodnichi bhakri Recipe in Marathi

 1. भाकरी मिक्सर मधून बारिक करा
 2. तेल गरम करा व त्यात मोहरी हिंग हळद कढिपत्ता घालून फोडणी करा
 3. शेंगदाणे घालून तळून घ्या
 4. हिरवी मिरची व चिरलेला कांदा घाला व परतून घ्या
 5. बारिक केलेली भाकरी घाला
 6. थोडे तिखट, मिठ घालून मिसळून घ्या
 7. आवडत असल्यास थोडी साखर घाला
 8. थोडा पाण्याचा एक हबका मारा
 9. वाफ आली की गॅस बंद करून कोथिम्बीर घाला व डब्यात द्या
 10. बरोबर दही नक्की द्या

Reviews for Phodnichi bhakri Recipe in Marathi (0)